Old Pension Scheme : पदोन्नतीतील आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी, जिल्हाधिकारी यांना निवेदन
Old Pension Scheme
Old Pension Scheme : पदोन्नतीतील आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू कराfile photo
Published on
Updated on

Implement reservation in promotions and the Old Pension Scheme

जालना, पुढारी वृत्तसेवा : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विनोद भगत यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांना बुधवारी (दि. २४) हे निवेदन देण्यात आले.

Old Pension Scheme
ST Employees Salary Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ

निवेदनात राज्याप्रमाणे कर्नाटक पदोन्नतीतील मागासवर्गीय आरक्षण तात्काळ लागू करावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतींना अडथळा ठरणारे शासन निर्णय रद्द करावेत तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सरळसेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तातडीने भरावा, राज्यातील कंत्राटी भरती धोरण रद्द करावे आणि वाहनचालक, परिचर आदी पदे सरळसेवा पद्धतीने भरावीत, अशी मागणीही करण्यात आली.

दिव्यांग विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासह कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच शासनाच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये लिपिक, लेखा व तांत्रिक पदे कमी न करता वाढत्या लोकसंख्येनुसार नव्या पदांची निर्मिती करून रिक्त पदे भरावीत, अशी मागणी महासंघाने केली आहे.

Old Pension Scheme
Jalna News : अंशकालीन निदेशकांना 18 हजार मानधन द्या

या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

यावेळी प्रदीप मघाडे, श्रीकृष्ण बकाल, संजय वानखेडे, उबेद कुरेशी, राहुल लालझरे, विश्वास भारती यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news