Shivbhojan Thali : 'शिवभोजन' चालकांचे तीन महिन्यांचे अनुदान लटकले

'शिवभोजन'ला ८३ लाखांचा निधी मंजूर; तरीही चालक कर्जाच्या विळख्यात !
Shivbhojan Thali
Shivbhojan Thali : 'शिवभोजन' चालकांचे तीन महिन्यांचे अनुदान लटकलेfile photo
Published on
Updated on

'Shivbhojan' operators' three-month subsidy pending

जालना, पुढारी वृत्तसेवाः गरीब, मजूर निराधार अन् रोजंदारी कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी शासनाने १० रुपयात शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र, शिवभोजन केंद्र चालकांना नियमित अनुदान मिळत नसल्याने त्यांना उसनवारीवर हे केंद्र चालवावे लागत आहे. परिणामी, ही योजना सरकारी अनास्थेच्या गर्तेत अडकली आहे.

Shivbhojan Thali
Sambhajinagar News : जिल्ह्यात ७७ शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापकपद

राज्य शासनाने जालना जिल्ह्यातील ३३ शिवभोजन केंद्रांसाठी नुकताच ८३ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला खरा; मात्र, त्यातून केवळ जुनी थकबाकी आणि एप्रिल-मे महिन्याचा खर्च भागला असून, जूनपासूनचे तीन महिन्यांचे अनुदान अजूनही थकलेलेच आहे. त्यामुळे उधारीवर धान्य, भाजीपाला आणून केंद्रे चालवताना केंद्रचालकांची मोठी दमछाक होत आहे.

शासनाने मंजूर केलेल्या ८३ लाख २४ हजार रुपयांच्या निधीमध्ये मागील आर्थिक वर्षातील (२०२५-२६) मार्च अखेरची ३१ लाख रुपयांची थकबाकी समाविष्ट आहे. तर उर्वरित ५२ लाख २४ हजार ५३५ रुपये हे चालू आर्थिक वर्षातील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या अनुदानापोटी मिळाले आहेत. तीन महिन्यांचे अनुदान अजूनही शासनाकडे प्रलंबितच आहे.

Shivbhojan Thali
Vehicle Theft Gang : वाहन चोरी टोळीतील दोघांकडून १२ दुचाकी जप्त

३३ केंद्रांवर हजारो गरिबांचा आधार

जालना शहरात २३ आणि ग्रामीण भागात १० अशी एकूण ३३ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. रोजंदारी कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक आणि ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी ही केंद्रे अत्यंत महत्त्वाचा आधार ठरत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ७२५ थाळ्यांचे वितरण करण्यात आले. यात शहरी भागासाठी १ लाख १७ हजार ९४ थाळ्या (मंजूर निधीः ४६ लाख ८३ हजार ७६० रुपये) तर ग्रामीण भाग २१ हजार ७३१ थाळ्या (मंजूर निधीः ५ लाख ४० हजार ७७५ रुपये) आहेत.

जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचा लेखाजोखा

एकूण शिवभोजन केंद्रेः ३३ (शहरीः २३, ग्रामीणः १०) नुकताच मंजूर निधीः ८३ लाख २४ हजार मार्च महिन्याची थकबाकीः ३१ लाख एप्रिल-मे चे अनुदानः ५२ लाख २४ हजार ५३५ प्रलंबित महिनेः जून, जुलै आणि ऑगस्ट (३ महिने) एप्रिल-मे मध्ये वितरित थाळ्याः १,३८,७२५ थाळ्या

अवघ्या काही रुपयांत थाळी देण्यापूर्वी केंद्रचालकांना धान्य, भाजीपाला, तेल, गॅस सिलींडर, कामगारांची रोजंदारी आणि जागेचे भाडे असा सगळा खर्च रोखीने करावा लागतो. मात्र, शासनाकडून अनुदान मिळण्यास ३ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. वाढत्या महागाईत किराणा आणि भाजीपाला विक्रेत्यांकडे उधारीसाठी रोज विनवण्या कराव्या लागत आहेत. शासनाने थकीत अनुदान तात्काळ वर्ग करून दरमहा नियमित निधी द्यावा.
अमोल खरात, शिवभोजन केंद्रचालक, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news