bullock pair prices : खरिपाच्या तोंडावर बैल बाजारात मोठी उलाढाल

गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बैलांच्या किमतीत मोठी वाढ
bullock pair prices
पिपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मंगळवारी भरणारा आठवडी बाजार खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर फुलून गेल्याचे पाहावयास मिळाले. बाजारात बैलांची मोठ्या संख्येने खरेदी विक्री झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. pudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी मोठा बैलांसह जनावरांचा बाजार भरतो. खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात बैलजोडी खरेदीसाठी मोठया संख्येने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. बाजारात 80 हजारापासुन दिड ते दोन लाखापर्यंत बैलजोडी विकल्या गेली.यामुळे बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

खरीप हंगामाच्या तोंडावर येथील मंगळवारच्या आठवडी बाजारात बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. पेरणीची लगबग सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदीसाठी गर्दी केली होती.

bullock pair prices
Ratnagiri Fish Rates : एलईडी मच्छीमारी, युद्धजन्य परिस्थितीचा फटका

मंगळवारी सकाळपासूनच बाजार मैदानात शेतकरी व व्यापाऱ्यांनी गर्दी केल्याने बाजार फुलून गेला होता. बाजारात 800 ते 1000 बैल विक्रीसाठी आले होते. चांगल्या बैलजोडीला मोठी मागणी होती. बाजारात साधारण बैलजोडीची किंमत 70 हजार तर चांगल्या बैलजोडीची किंमत 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत होती.

bullock pair prices
Lonar turmeric price : हळदीला 13 हजार 714 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बैलांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मशागतीच्या कामासाठी बैलांना पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरेदी झाली. बाजारात मोठी उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण दिसुन आले.

bullock pair prices
Bullock pair price hike : खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोडीचे भाव वाढले

बाजारात उत्साह

बाजारात बैल बाजारामुळे छोट्या हॉटेलमधुनचहा, नाश्ता व कृषी औजार विक्री करणाऱ्या व्यावसायीकांचा चांगला धंदा झाला. खरीप हंगामाच्या तोंडावर पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारात सकारात्मक उलाढाल झाल्याने बाजारात उत्साह दिसुन आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news