Lonar turmeric price : हळदीला 13 हजार 714 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर

लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद खरेदीला सुरुवात, शेतकऱ्यांचा प्रतिसाद
Lonar turmeric price
लोणार ः बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आणणाऱ्या महिला शेतकरी जनाबाई बेले यांचा सत्कार करताना सभापती प्रा. बळीराम मापारी. pudhari photo
Published on
Updated on

लोणार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद खरेदीला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. सभापती बळीराम मापारी यांच्या उपस्थितीत हळदी खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, खरेदीच्या पहिल्याच दिवशी हळदीला प्रतिक्विंटल 13 हजार 714 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून हळद पिकाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. अनुकूल हवामान, सुधारित बियाणे आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेअभावी शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी हिंगोली, रिसोड, शेंनगाव, वाशिम अशा बाहेरील बाजारपेठांमध्ये जावे लागत होते. यामुळे त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाढत होता.

Lonar turmeric price
Maharashtra Onion Mahabank: राज्यात उभारणार कांदा महाबँक; समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी सुविधा

ही समस्या लक्षात घेऊन लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने पुढाकार घेत स्थानिक पातळीवरच हळद खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री थेट लोणार येथेच करता येत असून त्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

रायगाव येथील हनुमान विश्वनाथ नागरे, जनाबाई बेले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजार समितीत पारदर्शक व्यवहार, अचूक वजन काटे आणि योग्य दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Lonar turmeric price
Ratnagiri News : पूरक उत्पन्नाचा आधार ठरतेय काळी मिरी पीक

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान सुलताने, बाजार समितीचे संचालक तेजराव घायाळ, भगवान कोकाटे, शिवकुमार तेजनकर, संजय आटोळे,मोतीराम डव्हळे, राम भालेराव, खरेदीदार राजुसेठ बोरा, एकनाथ सानप आदी मान्यवर उपस्थित होते. सभापती मापारी यांनी अडचणी जाणून घेतल्या आणि बाजार समितीमार्फत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

पिकाचे क्षेत्र वाढले

सभापती बळीराम मापारी यांनी सांगितले की, तालुक्यातील ग्रामीण भागात हळद पिकाची लागवड वाढत असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूरच्या बाजारपेठांमध्ये जावे लागू नये, या उद्देशाने स्थानिक स्तरावरच खरेदी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर हळद खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होत असून हा उपक्रम कृषी क्षेत्राला बळकटी देणारा ठरत आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार होऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news