Marathwada Mukti Sangram Din : पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात : मान्यवरांकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
Marathwada Mukti Sangram Din
Marathwada Mukti Sangram Din : पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणfile photo
Published on
Updated on

Hoisting of the flag by the Collector in the absence of the Guardian Minister

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.

Marathwada Mukti Sangram Din
Jalna News : आकांक्षित जिल्ह्यांना विकासाची नवी 'दिशा'; स्वच्छ पाणी, वीज अन् डिजिटल सुविधांचे जाळे

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण, माजी आमदार राजेश टोपे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधु, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांनी टाऊन हॉल परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

Marathwada Mukti Sangram Din
MP Dr. Kalyan Kale : महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी झालेल्या ऐतिहासिक संग्रामात जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. या लढ्यातील हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण आजही जालना जिल्ह्याच्या इतिहासात अभिमानाने केले जाते. परतूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाला या लढ्याच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. कोलते पिंपळगावकरांनी २२ जून १९४८ रोजी रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा दिला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जंगल सत्याग्रहही झाले, असल्याचे सांगितले-

१०३ रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

जालना : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मृदूला भाटिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तपूर्वी जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.पी. दिवाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या रक्तदान शिबिरातील १०३ रक्त्तदात्यांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप व आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. उपविजेत्या संघाचे कर्णधार वकिल संघाचे उपाध्यक्ष अॅड. अशोक वाहूळकर यांनी बक्षीस स्वीकाले.

या कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एन. एस. शेख, श्रीमती बी. एस. गारे, आर. बी. पारवेकर, वर्षा निहलानी, जी. आर. ढेपे, सदस्य सचिव नितेश बंडगर, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. पाडोळीकर, न्यायाधीश ए. आर. नागोरी, न्यायाधीश एच. वाय, कावले, अॅड विनायकराव चिटणीस, अॅड स्वप्नील खराबे, जिल्हा सरकारी अभियोक्त्ता अॅड. बाबासाहेब इंगळे, सहायक जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. जयश्री बोराडे, अॅड. खांडेकर, अॅड, मते, अॅड. दिपक कोल्हे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. परमेश्वर गडगीळे, उपाध्यक्ष अॅड. अशोक वाहूळकर, सचिव विनोद कुलकर्णी, सह सचिव अॅड. शिवनाथ जन्हऱ्हाड, अॅड. अरविंद मुरमे आर्दीची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news