

MP Dr. Kalyan Kale: The Municipal Corporation will demand the dismissal from the Chief Minister
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्ये सातत्याने वाद-विवाद व भांडणे सुरू असून, त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर आणि नागरिकांच्या प्रश्नांवर होत असल्याचा आरोप करून जालना महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे सांगितले.
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार, दि. १७ रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मामा चौक येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, महानगरपालिका ही शहराच्या विकासाचे केंद्र असते. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर प्रश्नांवर प्रभावीपणे काम होणे अपेक्षित असताना महापालिकेतील अंतर्गत वादांमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना कल्याणराव दळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी बदर चाऊस, माजी आमदार राजेश राठोड, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते संजय मुथा, सुनील चौधरी, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, ज्ञानेश्वर भादरंगे, चैतन्य जायभाये, नंदा मित्तल, करिम बिल्डर, देविलाल डोंगरे आदी उपस्थित होते. शहर काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच विविध सेलचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन रघुवीर गुडे तर आभार आदित्य चंदनकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या वतीने करण्यात आले.