Bhokardan Rain : भोकरदनमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने प्रचंड नुकसान

शहरात अनेक दुकानांसह घरांत शिरले पावसाचे पाणी
Bhokardan News
भोकरदन, ढगफुटीसदृश्य पावसाने प्रचंड नुकसान File Photo
Published on
Updated on

Bhokardan Heavy rains, cloudbursts cause extensive damage

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन शहरासह तालुक्याच्या इतर भागात शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री व रविवारी सकाळी पडलेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असतांनाच काही ठिकाणी पिके वाहन गेली आहेत. शहरांमध्ये बाजारपेठेतील दुकाने तसेच नागरी वस्त्यां मधील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Bhokardan News
Tomato Crop Loss : टोमॅटो पिकाचे दोन लाखांचे नुकसान

शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. मात्र मध्यरात्रीच्या दरम्यान मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शहरांमधील रफिक कॉलनी, हबीब कॉलनी, डॉक्टर राजपूत यांच्या अमर हॉस्पिटल सह त्याच्या पाठीमागील भाग यासह अनेक वस्त्यांमध्ये तसेच बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांतील सामान तसेच घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

रात्रभर नागरिकांनी पावसामुळे भयभीत होऊन संपूर्ण रात्र जागून काढली. तालुक्यातील पूर्णा, खेळणा नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.

Bhokardan News
Construction Workers Health : बांधकाम कामगारांच्या आरोग्याला महामंडळाचे बळ, २ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

हसनाबाद रस्ता पाण्याखाली

भोकरदन येथून हसनाबाद कडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील निमगाव येथे पूर्णा नदीच्या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला. यामुळे हसनाबाद आणि परिसराचा भोकरदनशी असलेला संपर्क तुटला. छत्रपती संभाजी नगर कडे खाजगी वाहनाने जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे त्यांना पर्यायी रस्ता वापरावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news