Jalna News : भोकरदन येथील अतिक्रमणांवर हातोडा

भोकरदन नगर परिषदेच्यावतीने शुक्रवारी (दि.३) सकाळपासून अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेण्यात आली.
Jalna News
Jalna News : भोकरदन येथील अतिक्रमणांवर हातोडा File Photo
Published on
Updated on

Hammer on encroachments at Bhokardan

भोकरदन : पुढारी वृत्तसेवा

भोकरदन नगर परिषदेच्यावतीने शुक्रवारी (दि.३) सकाळपासून अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी असलेल्या जकात नाका परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. भोकरदन नगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जकात नाक्यावर अनेक वर्षांपासून करण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात आली.

Jalna News
Lumpy Disease : सात महिन्यांत लम्पीने घेतला ३८ जनावरांचा बळी, १०९९ जनावरांना झाली लम्पीची लागण

या मोहिमेत भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालयीन अधीक्षक नामदेव गाडेकर यांच्या अधिनस्त मोहीम पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. नगर परिषदेच्या इतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. या कारवाई दरम्यान भोकरदन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलिसांचा यावेळी चोख बंदोबस्त होता.

अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे रस्त्यांनी मोकाळा श्वास घेतला. नगर पालिकेने रस्त्यावर अतिक्रमण करू नये असे आवाहन मोहिमेदरम्यान केले आहे. शहरात इतर भागांतही अतिक्रमण असल्याने त्यावरही कारवाई करण्यात येऊ शकते.

Jalna News
Jalna Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दिवाळे

भोकरदन शहरात नगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. ही मोहीम यापुढेही चालू रा-हणार का, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news