

Jalna Farmers suffer heavy losses due to heavy rains
सादिक शेख
आन्वा: जून महिन्यात पाऊस कधी पडेल आणि पेरणी कधी पूर्ण होईल, याबाबतची भ्रांत शेतकऱ्यांच्या मनातून दूर झाली होती. पाऊस पडल्यामुळे स्वप्नातील पिके शेतात वास्तवात बहराला लागली होती. शेतकऱ्यांची अशा होती की यंदाची दिवाळी व दसरा उत्साहात साजरे करता येतील, परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीने होत्याचे नव्हते झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहेत. ऐन सणासदीच्या काळात दिवाळे निघाल्याने आता दिवाळी कशी साजरी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
मध्यतंरी पावसाची अनियमित दडी तरीही योग्य वेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नातील पिकांना बहर आला; मात्र, गणेश बसली ोत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाला. पोळ्यानंतर पाऊस कमी होतो. अशी पारंपरिक अपेक्षा गेल्या काही वर्षांत मोडीत निघाली आहे. यंदाही जोरदार पाऊस पडल्याने अनेक शेतांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले आहे.