Jalna Farmer News : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी
Jalna Farmer News
Jalna Farmer News : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनFile Photo
Published on
Updated on

Guidance from scientists by visiting farmers' fields

जालना, पुढारी वृत्तसेवाः खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन क्षेत्रीय भेटीत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या व मार्गदर्शन केले. बुधवार (दि.१२) रोजी मासेगाव येथील क्षेत्रीय भेटीत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Jalna Farmer News
NAFED : नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी

मासेगाव येथे समूह पीक प्रात्यक्षिक अंतर्गत गोदावरी तुरीच्या वाणाची पाहणी केली. सध्या फुलोरा अवस्थेत मध्ये शेतकऱ्यांनी १ टक्का मोनो अमोनियम फॉस्फेट व ०.५ टक्के सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड या मिश्रणाची फवारणी करावी, असा सल्ला विशेषज्ञ (मृदशास्त्र) राहुल चौधरी यांनी दिला. रब्बी हंगामाची लागवड करत असताना हरभरा पिका मधील फुले विक्रांत तसेच फुले विश्वराज या वाणांचा वापर करावा तसेच करडई पिकासाठी नवीन सुधारित वाढ पीबीएनएस १८४ या सुधारित वाणांचा वापर करायचा सल्ला यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी दिला.

तूर पिकात गुंडी, फुल व कळी अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव होतो. तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशीमुळे उत्पादनात घट येते, यासाठी गुंडी, फुल व शेंग अवस्थेमध्ये फवारणी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी किडीची आर्थिक नुकसान पातळी पाहून फवारणीचा निर्णय घ्यावा. सध्या काही प्रमाणात फुल व शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे या काळात अळीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरेन्ट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली प्रति १० लि पाण्यात मिसळून फवारणी करावी. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यामुळे तुरीमध्ये फायटोफतोरा बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यासाठी ट्रायकोडर्मा २०० मिली किंवा मेटीरम पायकलोस्ट्रॉबीन या मिश्रन बुरशी नाशकाची २० ग्राम प्रति १० लि पाणी या प्रमाणात द्रावण करून आळवणी करावी असा सल्ला पीक संरक्षण विशेषज्ञ अजय मिटकारी यांनी दिला.

Jalna Farmer News
मंठा-जालना महामार्गावर जीप-ट्रॅक्टर अपघातात दोन ठार

सिंचनाची सोय करताना या गोष्टी ध्यानात घ्या : वासरे

ओलावा पाहून पेरणी करावी. पेरणी झाल्यानंतर मातीचा अथवा जमिनीचा वरचा थर कोरडा झाल्यास हलके तुषार सिंचनाने पाणी द्यावे. तुरीचे सिंचन करीत असताना किमान २० ते २१ दिवस अंतर ठेवावे. रान काळी व भारीचे जमीन असल्यास जमिनीची परिस्थितीनुसार सिंचन करावे. सोयाबीन व इतर पिकांचे रान, खरीप पिकाचे रान जर आणखी वापसा आलेले नसतील तर वापसा येण्याची वाट पहावी. रब्बी पिकातील हरभरा व ज्वारी बीबीएफ तंत्रज्ञानावरच पेरणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news