

Two killed in jeep-tractor accident on Mantha-Jalna highway
मंठा, पुढारी वृत्तसेवा मंठा-जालना महामार्गावर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकणी पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (एमएच २३ एडी ७०८१) कार मंठा येथून जालनाच्या दिशेने जात असताना उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली. यामुळे हा अपघात झाला आहे.
या अपघातात छत्तीसगड येथील सुरेंद्र सिंह व सुशांत केवट यांचा मृत्यू झाला आहे. तर स्कॉर्पिओमध्ये असलेले राजा शाहू, सनी चव्हाण, विशाल साबू, नमस्कार जैना राजा यादव, अशोक चोले हे पाच जण जखमी झाले आहेत. ऊसतोडीसाठी नागपूरहून केजकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वाटूर येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, एपीआय विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे, सुनील आणि जगन्नाथ सुक्रे हे करत आहेत.