

Goods worth ₹20 lakh, including gutkha worth ₹11 lakh, were seized.
जालना, पुढारी वृत्तसेवा: जाफराबाद-टेंभुर्णी रस्त्यावर गुटख्याची वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो पकडून पोलिसांनी १० लाख ७९ हजार ९८० रुपयांच्या गुटख्यासह१९ लाख ७९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जालना स्थानिक गुन्हा शाखेच्यावतीने ३१ डिसेबर रोजी रात्री साडेअकरा वाजता जाफराबाद येथील टेंभुर्णी रोडवर गुटखा घेऊन टाटा ४०७ जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर टाटा ४०७ वाहन थांबवून वाहनचालक अस्लम शेख नुर शेख (रा.शेरसवार नगर जालना) यांच्या ताब्यातून मानवी आरोग्यास घातक अस-लेला प्रतिबंधीत असलेल्या लहान मोठ्या पोत्यामध्ये ७ लाख ७१ हजार ३०० रुपये किमतीचा गोवा, १००० गुटखा पान मसाला व तंबाखू, १ लाख ८८ हजार ३०० रुपये किमतीचा अलीबाबा पान मसाला गुटखा व तंबाखू, ९९ हजार २०० रुपये किमतीचा राजनिवास गुटखा पान मसाला, २ लाख ३० हजार १८० रुपये किमतीचा डायरेक्टर पान मसाला, धारिवाल स्वदेशी तंबाखू, शॉट ९९९ अशी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू असा १० लाख ७९ हजार ९८० रुपयांचा माल पोलिसांनी पकडला. यावेळी गुन्हा करण्यासाठी वापरलेले ७ लाख रुपये किमतीचे टाटा ४०७ वाहन असा एकूण १९ लाख ७९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुध्द फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस अंमलदार रामप्रसादर पव्हरे, सॅम्युअल कांबळे, प्रशांत लोखंडे, जगदीश बावणे, दीपक घुगे, सतीश श्रीवास, सागर बाविस्कर, धीरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके, सौरभ मुळे, सोपान क्षीरसागर सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यात गुटख्यावर
कारवाई होत असतानाच मोठ्या प्रमाणात गुटखा येताना दिसत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी किराणा दुकान, पानटपऱ्यातून गुटखा विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गुटखा विक्रीतून चांगला नफा मिळत असल्याने अनेक व्यावसायिक चोरी-चोरी गुटखा विक्री करताना दिसत आहेत.