

Customers crowded the Buldhana bank, demanding to withdraw deposits and retrieve gold pledged as collateral
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या दारात खातेदारांनी ठेवी व सोन तारण काढण्यासाठी तुफान गर्दी केली आहे.
बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा बंद होणार म्हणून जोरात बँकेची अफवा पसरल्याने सोन तारण व ठेवीदार सभासद यांनी दोन तीन दिवसांपासून गर्दी केली आहे. सहकार क्षेत्रातील खातेदारांना ज्ञान राधा पत संस्थेचा अनुभव वाईट आला आहे. बुलढाणा अर्बन बाबतीत अशीच चर्चा सुरू झाली. ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या सहकारी क्रेडिट संस्थावर निर्बंध नाही मनमानी कारभार सभासदांची पिळवणूक अवाच्या सव्वा व्याज दर यामुळे खासगी संस्थेचे काहीच खरे नाही म्हणून आम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवी ठेवलेली बरी. याच्यावर कोणाचा वचक नसल्याचे ग्राहक सांगत आहे.