Jalna gutkha seizure : सव्वासहा लाखांचा गुटखा पकडला

कारवाईत सुमारे 6 लाख 26 हजार 212 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna gutkha seizure
जालना ः अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी पकडलेल्या गुटख्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

जालना : मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर गोंदी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 लाख 26 हजार 212 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिसांनी शहागड येथील राणा बँक परिसरात छापा टाकला. त्यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला व दुकानात साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचे आढळून आले.

Jalna gutkha seizure
Jalna crime | रांजणीत पोलिसांची मोठी कारवाई; पावणेदोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

या प्रकरणी मैनोद्दीन हसन तांबोळी (रा. काळी मशीदजवळ, शहागड, ता. अंबड) याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, तंबाखू उत्पादने तसेच मारुती डिझायर कार (एमएच-04-इएक्स 7764) असा 6 लाख 26 हजार 212 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Jalna gutkha seizure
MD Drugs Seized | खंबाळा शिवारात मोठी कारवाई: १५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; नागपूरच्या तरुणाला अटक

या कारवाईत सपोनि. अविनाश गडाख, सपोउपनि. दिनेश बर्डे, जमादार सचिन कोकणे, पोलिस कर्मचारी निरंजन बकाल, हरी जाधव, महिला पोलिस मोघा बोराडे , चालक नंदकिशोर जैवाळ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास जमादार केंद्रे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news