MD Drugs Seized | खंबाळा शिवारात मोठी कारवाई: १५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; नागपूरच्या तरुणाला अटक

Chandrapur Crime | चंद्रपूर-नागपूरमधील दोन साथीदार फरार, वरोरा पोलिसांत NDPS अंतर्गत गुन्हा दाखल
Khambala Shivar Raid
खंबाळा शिवारात रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी १०१ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज पावडरसह एका आरोपीला अटक केली Pudhari
Published on
Updated on

Drug Bust Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर  जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरला मोठे यश मिळाले आहे. वरोरा तालुक्यातील खंबाळा शिवारात रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी १०१ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज पावडरसह एका आरोपीला अटक केली असून सुमारे १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी जिल्ह्यातील वाढत्या ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले होते. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक वरोरा परिसरात गस्तीवर असताना त्यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. नागपूर येथील एक इसम मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी चंद्रपूरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

Khambala Shivar Raid
Chandrapur crime news: बाप रे! संपत्तीसाठी सख्या बहिणीचा गळा चिरला, आईवरही वार; चंद्रपूर हादरलं!

यानंतर पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील खंबाळा शिवारात अत्यंत शिताफीने सापळा रचण्यात आला. दरम्यान, संशयास्पदरीत्या मोपेडवरून आलेल्या युवकाला थांबवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून १०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. चौकशीत आरोपीने हा माल नागपूर व चंद्रपूर येथील साथीदारांच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

या प्रकरणात पोलिसांनी अमित कृष्णा गजभिये (वय २३, रा. इंदोरा, नागपूर) याला अटक केली आहे. तर हर्षल टेंभेकर (रा. इंदोरा, नागपूर) आणि सोहेल शेख उर्फ सोहेल एसके (रा. चंद्रपूर) हे दोघे साथीदार फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Khambala Shivar Raid
Chandrapur Crime | धाबा पोलिसांची मोठी कारवाई: गोजोली जंगलातून २३ लाखांच्या हायटेंशन पॉवर केबल जप्त; पाच आरोपी जेरबंद

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, एक मोबाईल फोन आणि एमएच ३१ एफएच २०४९ क्रमांकाची मोपेड असा एकूण १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर आरोपीविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये NDPS Act कलम ८(क) व २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतिश अवधरे, रजनिकांत पुष्ठावार, दिपक डोंगरे, इखान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, कार्तिक खनके, अनिमेश भोंगळे तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या कर्मचाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news