

International Yoga Day celebrated with enthusiasm across the district
जालना, पुढारी वृत्तसेवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी (दि. २१) रोजी जालना शहरसह जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध संस्था, योग समिती, शाळा, महाविद्यालयात बोग व प्राणायमचे आयोजका करण्यात आले. विद्यार्थ्यांनसह मान्यवरानी योगासने केली.
टेंभुर्णी जिल्हा परिषद शाळेत मार्गदर्शन टेंभुर्णी जाफराबाद तालुक्यातीलत टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओम शांती सेंटर च्या शकुंतला दीदी यांनी विद्यार्थ्यांना योगा बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यावेळी शालेय समितीचे सदस्य रत्या अंभोरे, मुख्याध्यापक अशोक हरकळ, आनंदा गाने, प्रणिती आव्हाळे, सानप, राजू डाहळे, शेळके, इंगळे आदीची उपस्थिती होती.
कै. नानासाहेब पाटील विद्यालय, नजिक पांगरी बदनापूर : तालुक्यातील नजिक पांगरी येथील के, नानासाहेब पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी विद्यार्थ्यांनी बैठे, उभे योगासने, ध्यान व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व समजावून सांगितले.
डोणगांव : जाफराबाद तालुक्यातील डोणगांव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेत सरपंच पूनम कुंडलिक घोडके यांच्यासह मान्यवर प्रमुख उपस्थितीत आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेश व बूट सॉक्स चाटप करण्यात आले. योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंच पूनम घोडके यांनी योगाची प्रत्येक खियांना पुरुष व विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन गरज असल्याचे व आपापल्या शरीराला होणारे फायदे ज्याची थोडक्यात माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच पूनम कुंडलिक घोडके, मुख्याध्यापक कलीमुद्दीन बुकणे, राजेंद्र पाचरणे, जयदीप विस्ने, नजमुद्दीन शेख, शेख मोहिब, आफ्रीन सिद्दिकी कुंडलिक घोडके, राजू घोडके, मदन चांदोलकर, शाळा समिती अध्यक्ष अन्सार कुरेशी, ग्रामसेवक आर. आय. मोगल यांच्यासह आदीची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कार्यालय, डोणगाव डोणगांव: जाफराबाद तालुक्यातील डोणगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय मोगा दिनानिमित्त योगा घेण्यात आला. यावेळी सरपंच पूनम घोडके, उपसरपंच मिलिंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य परशुराम रजाळे, बाबासाहेब पुंगळे, गंगाधर खरात, मारोती पुंगळे, राजू मोडके, मनोज पिंपळे, शेख सगीर, ग्रामसेवक आर. आय. मोगल, अंगणवाडी व बालवाडी कार्यकर्त्या मदतनीस आरोग्य कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते.
राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल, जालना जालना: चौधरी नगर येथील मिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेण्यात आली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मैदानावर विविध प्रकारचे योगासने द प्राणायाम केली. या योग दिनासाठी योगशिक्षक डॉ. सुप्रिया चलमेटी, चंदना गुलागेल्ली, संजीव वंगर, स्वरूपा वंगर, सुनंदा बाघ यांनी योगाने व प्राणायाम याचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मोटे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. सुगदेम मांटे, प्राचार्या लतिका मनोज, उपस्थित होते. वावेळी वरुण अंबेकर, अपर्णा भंडारे, डॉ. वर्षा शेळके, अभिजीत भंडारे, प्रियंका शिंदे, रेखा जाधव, सचिन टेकूर, पल्लवी काळे, आरती वाघमारे, अंकिता सरनाईक, पूजा उपलंचवार, कविता बेलनूर, आशिष घुमारे, आदित्य मानमोडे, अक्षय कासार, रेखा राजगुरू, सोनाली सेवलकर, समृद्धि निलंगेकर, प्रतीक निर्मल, गिरिराज कुलकर्णी, शामली खानझोडे, वानेश्वर भुतेकर, राजू काकड, सुरेश दराडे, लक्ष्मी शिनगारे, रोषणा सुराणा, सुरेखा वाघमारे, राजश्री साबळे, निवृत्ती खांडेभराड आदि उपस्थित होते.
पारस । भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षक समाधान लोखंडे यांनी विद्याथ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले च विविध योगासने व प्राणायाम करून दाखविले व विद्याथ्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने योगासने केली.
यावेळी माजी मुख्याध्यापक अजहर पठाण, केंद्रप्रमुख मनोज लोखंडे, मुख्याध्यापक डी.बी सोनुने, साळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद लोखांडे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बदनापूर : निरोगी आणि सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे नियमित सकाळी व्यायाम करणे, रोज सकाळी व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते व शरीराला नेहमी ताजेतवाने वाटते. सोबतच शरीराला देखील नेहमी सकारात्मक ऊर्जा व्यायाम केल्याने मिळते. असे प्रतिपादन आ. नारायण कुचे यांनी केले. योग दिनानिमित्त पाथ्रीकर कॅम्पस येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये आ. नारायण कुचे यांनी देखिल सहभाग घेतला होता. तसेच योगा प्रशिक्षक वकील बालाजी वाघ, बदनापूर विधानसभा प्रमुख अनिलराव कोलते, भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव मात्रे, डॉ. रामेश्वर पाटील, विलासराव जहऱ्हाड, पद्माकर जन्हाड, सहदेव अंभोरे, अमृत तारो, विनोद मगरे, ललिता भगुरे, संतोष बरकड, सुरेश लहाने, युनुस गुडू, मुस्ताक शेख, गोरख रसाळ, गणेश कोल्हे, जादुसिंग जारवाल, रवींद्र वाहळ, माऊली गव्हाणे, सुधिर पवार, शहरातील नगरसेवक, कार्यकर्त्य, आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व योग प्रेमी नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.