HSC board exam
घनसावंगी ः संत रामदास महाविद्यालय येथे परीक्षा केंद्रावर बारावीचा पेपर देताना विद्यार्थी. ( छाया ः अविनाश घोगरे)

HSC board exam : तालुक्यात बारावीचा पहिला पेपर सुरळीत; तीन केंद्रांवर परीक्षा

पहिल्या पेपरला 28 विद्यार्थी गैरहजर
Published on

घनसावंगी : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारपासून (दि.10) सुरुवात झाली. पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला.

घनसावंगी तालुक्यात तिन केंद्रातून 1 हजार 473 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 28 विद्यार्थी गैरहजर राहिले. यामुळे 1 हजार 445 विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या पहिल्या पेपर दिला. यात संत रामदास महाविद्यालय, कै. दत्तासाहेब देशमुख महाविद्यालय, मस्त्योदरी कनिष्ठ महाविद्यालय तिर्थपुरी या 3 परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

HSC board exam
Chatrapati Sambhajinagar ZP Election Results : कन्नडच्या नागद गटाने राखली काँग्रेसची शान

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके बैठकी पथके नेमण्यात आली होती. परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली परीक्षेच्या अर्धा तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या ठिकाणी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती दिसून येत होती. पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजीच्या पेपरमुळे विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला होता. इंग्रजी पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची पातळी कठीण असल्याचे दुपारी दोन वाजता पेपर सोडवून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता मात्र पेपर उत्तम चांगली गेल्याची प्रतिक्रिया मुलांनी दिली.

HSC board exam
Sand mafia attack on teacher : वाळु माफीयांचा शिक्षकावर हल्ला

संत रामदास महाविद्यालयाचे केंद्र संचालक प्रा. संतोष आडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावीची परीक्षा शांत व सुरळीत पार पडत आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रावर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.या दरम्यान तहसीलदार रमेश पागोटे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी तसेच केंद्रप्रमुख सचिन आनंद होनराव यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तालुक्यात सुरळीत पेपर सुरळीत असल्याचे दिसून आले.

12 वीची परीक्षा पारदर्शी होण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके यांचा केंद्रावर आहे. जर गैरप्रकार करताना कोणता विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

रविंद्र जोशी, गटशिक्षण अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news