Sand mafia attack on teacher : वाळु माफीयांचा शिक्षकावर हल्ला

कुंभारझरीची घटना, वाळु चोरीला केला विरोध
Sand mafia attack on teacher
वाळु माफीयांचा शिक्षकावर हल्ला File Photo
Published on
Updated on

टेंभुर्णी : जाफ्राबाद तालुक्यातील कुंभाझरी येथे पुर्णानदी पात्रातून रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा क रणाऱ्रू वाळु माफीयांना विरोध केल्याने शिक्षक रावसाहेब चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असुन या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाफराबाद तालुक्यातील कुंभाझरी येथून बोटीच्या साह्याने रात्रीच्या अंधारात खुलेआम अवैध वाळू उपसा सुरु आहे. रात्री भरधाव वेगाने हायवा मध्ये अवैध वाळू उपसा ही वाळु काचनेरा ते पापळ मार्गाने नेली जात असल्याचा आरोप आहे. शिक्षक रावसाहेब चव्हाण यांनी अवैध वाळु उपसा करणाऱ्यांना विरोध केल्याने वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात केली आहे.

Sand mafia attack on teacher
Illegal sand mining : पुर्णा नदी पात्रात वाळु माफीया सक्रिय;25 ब्रास अवैध साठा जप्त

अवैध वाळू चोरीच्या पैशावर माफीया गब्बर झाले असुन कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी वाळु माफियांवर कारवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Sand mafia attack on teacher
Supreme Court hearing on Khula law : पतीच्या संमतीशिवाय मुस्लीम महिला घटस्फोट घेऊ शकते का?

शासकीय लिलाव झाला परंतु लोकेशन पध्दतीने वाळू उपसा करण्यासाठी परवानगी असताना रात्रीच्या अंधारात वाळू चोरी केली जात आहे.रात्री नदीपात्रातील वाळू उपसा करण्यास परवानगी नसताना केवळ शासकीय रायलटी वाचण्यासाठी ही अवैध वाळू चोरी केली जाते. महसूल विभागाने यावर लगाम घालावा.

रावसाहेब चव्हाण, शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news