

घनसावंगी : गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी केली.
तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसह आंबा व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावेळी पंढरीनाथ उगले, सर्जेराव जाधव, डिगांबर ढेरे, रमेशराव काळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.