सहावी ते आठवीची खोटी मान्यता दाखवून शासनाची फसवणूक !

कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याचा पत्रपरिषदेत आरोप
Fake Documents Case |
Fake Documents Case | खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक File Photo
Published on
Updated on

Fraudulent Deception of the Government by Falsely Claiming Recognition for Grades 6 to 8!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील रेल्वे स्टेशन भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने चक्क मंत्रालयाचे बनावट शुध्दीपत्रक तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मॉडेल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचलित हुदा उर्दू प्रायमरी शाळेने इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी खोटी मान्यता दाखवून शासनाचा निधी लाटल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Fake Documents Case |
Jalna News : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‌‘दिव्यांगत्वा‌’च्या पडताळणीला खो!

खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेला २०१२ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मान्यता मिळाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये पाचवीचा वर्ग विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र, नैसर्गिक वाढीनुसार सहावी आणि सातवीचे वर्ग बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही, संस्था अध्यक्ष शेख वहीद आणि मुख्याध्यापक उबेद सिद्दीकी यांनी संगनमत करून १२ जानेवारी २०२२ रोजीचे राज्य शासनाचे बनावट शुध्दीपत्रक तयार केले.

या बनावट कागदपत्राच्या आधारे सहावी ते आठवीचे वर्ग सुरू असल्याचे भासवून शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या केल्या आणि त्यांच्या वेतनापोटी शासनाकडून लाखो रुपये लाटले, असल्याचाही आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

Fake Documents Case |
मराठवाडा कृषी विद्यापीठात कोट्यवधींचा घोटाळा; लेखा परीक्षणातून उघड

मंत्रालयानेच दिला बनावट असल्याचा निर्वाळा

या शुध्दीपत्रकाची सत्यता पडताळण्यासाठी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला असता, मंत्रालयाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी हे शुध्दीपत्रक शासन स्तरावरून निर्गमित झाले नसल्याचे स्पष्ट केले. हे पत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित संस्थाचालक आणि मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, चार वर्षे उलटूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप खंडेलवाल यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news