Jalna crime : जामीन नाकारल्याने पक्षकाराने केली वकिलाला मारहाण

अंबड पोलिसांत तक्रार दाखल
Jalna crime News
जामीन नाकारल्याने पक्षकाराने केली वकिलाला मारहाण File Photo
Published on
Updated on

अंबड : येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण गायके यांना त्यांच्या पक्षकारानेच मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना तालुक्यातील लोणार भायगाव येथे घडली आहे.या प्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील बालेपीर येथील संशयित अशपाक आसेफ शेख (ह.मु.लोणार भायगाव, ता. अंबड) हा ॲड. लक्ष्मण गायके यांचा पक्षकार असून त्याच्या विरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दरम्यान गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन न्यायालयाने संबंधित संशयित आरोपीचा जामीन नाकारला.

Jalna crime News
Sub-Registrar Office Inspection : उपमहानिरीक्षकांकडून रजिस्ट्री कार्यालयाची झाडाझडती

यातून ॲड. गायके हे लोणार भायगाव येथे 22 फेब्रुवारी रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले असता आरोपी अशपाक शेखने त्यांच्या शर्टाचा कॉलर पकडत तोंडावर बुक्के मारून ठार मारण्याच्या धमक्या देत .गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली.

Jalna crime News
Chief Minister Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना लाभ

गुन्हा दाखल

या प्रकरणाची तक्रार ॲड. गायके यांनी अंबड पोलिस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठुले हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news