Chief Minister Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना लाभ

ग्रामीण भागात साडेचार लाखांची मदत मंजूर
CMRF Hospital : मुख्यमंत्री सहायता निधी / Chief Minister's Relief Fund
मुख्यमंत्री सहायता निधी / Chief Minister's Relief FundPudhari file Photo
Published on
Updated on

घनसावंगी ः ग्रामीण भागात आजही गंभीर आजार झाल्यास उपचारांचा खर्च पेलणे अनेक कुटुंबांना जड जाते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठा आधार ठरत आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना या निधीतून एकूण 4 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक गरीब रुग्ण औषधोपचाराअभावी त्रस्त होते, तर काही कुटुंबांवर उपचारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली होती. दुर्धर आजाराच खर्च करणे या कुटुंबांना अवघड झाले होते.

CMRF Hospital : मुख्यमंत्री सहायता निधी / Chief Minister's Relief Fund
Water Bill Recovery Problem : थकीत पाणीपट्टी वसुलीचे पाटबंधारे विभागाला आव्हान

या कुटुंबियांनी या बाबतची माहिती आमदार हिकमत उढाण यांच्या कानावर घातली होती. आमदार हिकमत उढाण यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत संबंधित प्रकरणे शासन दरबारी मांडण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना वैद्यकीय खर्चासाठी मदत मंजूर करण्यात आली.

ग्रामीण भागात उत्पन्नाची साधने मर्यादित असून अचानक आजारपण ओढवल्यास कुटुंब पूर्णपणे कोलमडते. अशा वेळी शासनाकडून मिळणारी ही मदत अत्यंत मोलाची ठरत आहे. या निधीमुळे अनेक रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे शक्य झाले असून औषधे, तपासण्या तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे.

CMRF Hospital : मुख्यमंत्री सहायता निधी / Chief Minister's Relief Fund
Nanded New Development Works : नांदेडमधील नवीन कामांच्या वर्क ऑर्डरला खंडपीठाचे निर्बंध

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश सफल होत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकंना अडचणीच्या काळात शासनाने केलेल्या मदतीमुळे त्यांना आधार मिळाला आहे. ही खरी लोकसेवा असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.

या गावातील रुग्णांना झाला लाभ

गाव रक्कम

भाटेपुरी, ता. जालना - 75,000

एकलहेरा, ता. घनसावंगी - 50,000

गुरुपिंप्री, ता. घनसावंगी - 1,50,000

तिर्थपुरी, ता. घनसावंगी - 75,000

कोठाळा खु.,ता. अंबड - 1,00,000

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news