Farmers looted by cotton traders!
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरी आणि परिसरातील गावांमध्ये कापूस बाजारपेठेत सध्या शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू असल्याचे भीषण वास्तव आहे. "मापामध्ये पाप" अशी म्हण या हंगामात अक्षरशः खरी ठरत असून व्यापारी वगनि शेतकऱ्यांच्या कष्टांचे पांढरे सोने स्वस्तात लाटण्याचा धंदा फोफावला आहे.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात कापूस विक्रीसाठी गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून मनमानी भाव सांगितले जात आहेत. वजनात कपात, दर्जा कमी आघाड्यांवर शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. दाखवणे आणि मापनात हेराफेरी या तिन्ही "कापूस विकून मिळणारा भाव उत्पादन खर्चालाही पुरत नाही," अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी मांडली.
कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्या असल्या तरी ठोस कारवाईचा मागमूस नाही. अधिकारी येतात, कागदावर सही करतात आणि निघून जातात एवढ्यावरच त्यांचे काम संपते, असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे व्यापारी अधिक निर्भय बनले आहेत.
परिसरातील गावांमध्ये अनेक पर जिल्ह्यातील व्यापारी दाखल झालेले असून स्थानिक दलाला हाताखाली धरून शेतकऱ्याचा कापूस घेतल्या जातो. अनेक व्यापाऱ्याच्या मापामध्ये अनियमित्ता असते असे अनेक वेळा उघड झालेले आहे. काही गावांमध्ये तर बादही झाले आहेत. काही व्यापाराकडे स्थानिक गुन्हेगार प्रवृत्तीचे गुंडगिरी करणारे फंटर हाताखाली धरून काही उघड झाल्यास गुंडाच्या दहशतीखाली वाद मिटवायला जातो व्यापारी गुंडाला गाडीमागे दोन चार हजार रुपये देतात अशी असे बोलले जात आहे तर काही गावात राजकीय मंडळी व्या व्यापाऱ्याला असरे देतात स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याची काही देणे घेणे नाही.
किमान आधारभूत दर फक्त नावापुरता
"सरकारने ठरवलेला किमान आधारभूत दर कागदावर आहे, पण जमिनीवर व्यापारी त्याहून हजारो रुपयांनी कमी भाव देतात," असे स्थानिक शेतकरी सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.
आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही
या अन्यायाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. "प्रशासनाने आणि बाजार समितीने तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक खरेदी प्रक्रिया राबवली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू," असा तीव्र इशारा स्थानिक शेतकरी नेत्यांनी दिला आहे.