Jalna Agriculture News : हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

घनसावंगी : मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टर मशीनला पसंती
Jalna News
Jalna Agriculture News : हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाfile photo
Published on
Updated on

Farmers' inclination towards harvesting wheat using harvesters has increased

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील शेतकऱ्यांची गहू मळणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. परिसरात गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टर दाखल झाली आहेत. पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे.

Jalna News
Drowning Death : मित्रासोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता. या हार्वेस्टर मशीनने ते केवळ तासाभरात होऊ लागल्याने यांत्रिकीकरणास शेतकरी पसंती देऊ लागला आहे. हार्वेस्टरमुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करीत आहे. या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाली आहे.

सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीबरोबर गव्हाला पसंती दिली होती. पाण्याचा साठा बऱ्यापैकी असल्याने शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती.

जास्त पावसामुळे कपाशीला जास्त कैऱ्या नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू, हरभरा, ज्वारी पिकाची पेरणी केली होती. आता हे पीक काढण्यासाठी शेतकरी धावाधाव करताना दिसत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारी, गहू या पिकाची काढणी सुरू आहे. उताराही समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Jalna News
Jalna News : थकबाकी भरा ; अन्यथा पाणी, वीजपुरवठा खंडित

एक एकराचे काम अर्ध्या तासात

मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीनने गहू काढणे अधिक सोयीचे वाटते. पारंपरिक पध्दतीने गहू काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर व चार ते पाच हजारांपर्यंत मजुरी लागते. त्यात हा गहू मळणीकरिता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते. परंतु गहू काढण्याच्या या हार्वेस्टर मशीनमुळे एकरी अडीच हजार रुपये दर देऊन एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो. शेतकऱ्याला या यंत्राच्या मदतीने केलेले कामामुळे कमी वेळात काम होत असल्याने यास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे.

क्षेत्र कमी झाल्याने अनेकांनी बैलजोडी विकल्या परिणामी वेळेवर पेरणी करायला ट्रॅक्टर बोलवावे लागते. यांत्रिकीकरण वाढल्याने आता पारंपरिक सोंगणी, मळणी फारशी होत नाही. हार्वेस्टरनेच गहू काढण्याकडे सर्वांची पसंती आहे.
- सूर्यकांत धबडकर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news