Drowning Death : मित्रासोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खड्यांचा अंदाज आला नसल्याने घडली दुर्दैवी घटना
Drowning Death
मित्रासोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

17-Year-Old Student Dies While Swimming with a Friend

शहागड, पुढारी वृत्तसेवा :

मित्रासोबत गोदापात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १७वषर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. मयताचे नाव आदित्य आदिना मिरघे असे आहे. ही घटना सोमवार, दि. ९ रोजी घडली.

Drowning Death
Domestic gas : तीन दिवस पुरेल एवढाच घरगुती गॅसचा साठा

दरम्यान, अबंड तालुक्यातील गोरी - गंधारी शिवरस्ता येथील गोदावरी नदीपात्रात सोमवारी दुपारी उन्हाची तीव्रता पाहून मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या आदित्य मिरघे रा. गोरीवस्ती पैठण फाटा रोड व त्यांचे तीन मित्र गोदावरी नदीच्या पाण्यात पोहायला उतरले.

नदीच्या पाण्याचा आणि खड्यांचा अंदाज न आल्याने आदित्य गटांगळ्या खाऊ लागला. यात त्यांच्या सहकारी मित्रांनी जवळच चालू आसलेल्या ट्रॅक्टरकडे धाव घेत माहिती दिली. ट्रॅक्टरचालक आणि मजुरांनी गोदावरी नदीच्या पाण्यात उड्या घेऊन आदित्य यास बाहेर काढले.

Drowning Death
Gas Prices : गॅस दरवाढीविरोधात नूतन वसाहत येथे काँग्रेसचे आंदोलन

शहागड प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी नरवडे यांनी आदित्य यास वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. १०२ रुग्णवाहिकेने त्याला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ घेऊन जाण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news