

Pay Arrears; Otherwise, Water and Electricity Supply Will Be Disconnected
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांमधून बिनसिंचन योजनांद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाणीपट्टीची तब्बल १२ कोटी ६४ लाख ३९ हजार रुपये इतकी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी तत्काळ भरण्यासाठी संबंधित योजना धारकांना जालना पाटबंधारे विभागाने ७दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या भाग ६, कलम ४९ (ज) नुसार थकबाकीदारांनी पाणीपट्टीची रक्कम निर्धारित कालावधीत न भरल्यास संबंधित योजनांचा पाणीप रवठा तसेच वीजपुरवठा १६ मार्च पासून खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
थकबाकीदारांमध्ये नगर परिषद पाथरी (३६.२१ लाख), महानगरपालिका परभणी (२३०.३८ लाख), जिल्हा परिषद परभणी (१४१.९५ लाख), नगर परिषद पूर्णा (१७३.२५ लाख), नगर परिषद सेलू (१२४.८४ लाख), महानगरपालिका नांदेड (२२१.८४ लाख), नगर पंचायत मंठा (२५.२९ लाख) यांसह विविध प्रकल्प व ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तसेच भोकरदन, बदनापूर, मंठा, अंबड तालुक्यातील काही योजना व औद्योगिक घटकांकडेही मोठी थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित सर्व संस्थांनी तातडीने आवाहन कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे पाणीपट्टीची थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे विभाग यांनी केले आहे.
जिल्ह्यातील थकबाकीदार संस्था
(पाणीपट्टी थकबाकी रुपये लाखांत)
नगर पंचायत मंठा २५.२९
१७६ गावे पाणीपुरवठा ग्रुप योजना .... ६७.०८
९५ गावे पाणीपुरवठा ग्रुप योजना १२.२३
नगर परिषद भोकरदन ५२.६४
रामेश्वर साखर कारखाना, भोकरदन .... ९०.४२
नगरपंचायत बदनापूर २३.२३
नगर पंचायत मंठा ५३.०९
नगर पंचायत अंबड ५.९४