नमो शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा कायम

आन्वा : बँका-कृषी कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा, थकीत हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी
Farmers continue to wait for the installment payment
नमो शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा कायमFile photo
Published on
Updated on

Farmers continue to wait for the installment payment under the PM-Kisan scheme

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी - सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यात थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने तालुक्यातील शेतकरी सातत्याने बँक आणि कृषी कार्यालयांत चौकशीसाठी धाव घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपक्षा होती; मात्र ती अद्याप फोल ठरली आहे.

Farmers continue to wait for the installment payment
jalna news : नळविहिरा परिसरात माकडांचा उच्छाद

किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता महिनाभरापूर्वी वितरित झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या योजनेतू अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याने हप्त्याला होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तो तातडीने वर्ग केला जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Farmers continue to wait for the installment payment
10th Exam : ३७३३८ बारावी तर ३२४३३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती त्वरित करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. जे शेतकरी आयकर भरतात शासकीय सेवेत आहेत किंवा ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याचे राज्य

Farmers continue to wait for the installment payment
10th Exam : ३७३३८ बारावी तर ३२४३३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

सरकारकडील निधीकडे लक्ष

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरू केली आहे. या योजनेतून पत्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता आधीच वितरित झाला आहे. आता राज्य सरकारकडील निधीकडे सर्वाचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news