

Farmers angry over release of only eight km of water through canal
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील धामणा धरणांतर्गत येणाऱ्या सावंगी अवघडराव येथील कोरडवाहू शेतकऱ्यांना पाटाद्वारे पाणी सोडावे, या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाटबंधारे विभागाला ठराव देण्यात आला आहे. या ठरावाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने सोळा किलोमीटर पाणी सोडण्याऐवजी आठच किलोमीटर पाणी सोडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अवघडराव सावंगी ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने २९ डिसेंबर रोजी सरपंच अरबाज अब्दुल मन्नान बागवान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण ग्रामसभा घेतली. यावेळी सावंगी अवघडराव येथे शेलूद धरणातील पाणी पाटाला सोडणे बाबत ठराव क्रमांक (६) प्रकाश पुंजाजी गाढवे यांनी असे सुचवले कि सावंगी अवघडराव येथे शेलूद धरणातील पाणी हे पाटाला सोडले असता शेतकरी वर्गाला या पाण्याचा रब्बी पिका साठी मोठा फायदा होईल तरी शेलूद धरणाचे पाणी हे सावंगी पाटाला सोडणे साठी असा ठराव घेण्यात आला.
वरिष्ठ कार्यालात प्रस्ताव पाठवण्यात यावा. या संबंधीचे ठराव घेऊन पाटबंधारे विभागाला देण्यात आला. पाटबंधारे विभागाकडून १६ किलोमीटर पाणी सोडण्याऐ बजी फक्त आठ किलोमीटर पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे रब्बी हंगामाती पीके धोक्यात आली आहे. तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या बैठकील गणेश लक्ष्मण फुसे, प्रकाश पुंजाजी गाढवे यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
पाटबंधारे विभागाच्या वतीने १६ किलोमीटर पाटाद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र यावर्षी आठच किलोमीटर पाणी सोडण्यात आले आहे. पाट नादुरुस्त असल्यामुळे अजून आठ किलोमीटर पाणी सोडता येत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तत्काळ या संदर्भात उर्वरित आठ किलोमीटर पाट दुरुस्त करून शेतकऱ्यांनी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.