Kharif Season : मागील खरीप हंगामात कापूस, सोयाबीन पिकाच्या क्षेत्रासह उत्पादकतेतही घसरण

जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ; उत्पादकतेतही चढता आलेख, बाजरीचे पेरणी क्षेत्र दुपटीने घटले
Kharif Season
Kharif SeasonPudhari
Published on
Updated on

During the previous Kharif season, there was a decline in both the acreage and productivity of cotton and soybean crops

संघपाल वाहूळकर

जालना : जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ मध्ये कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांच्या क्षेत्रात तसेच उत्पादकतेत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, खरीप हंगामाचे कापसाचे क्षेत्र २ लाख ७८ हजार ९२४ हेक्टरवर आले असून उत्पादकता २७८.२१२ कि.ग्रॅ./हे. इतकी नोंदविण्यात आली आहे. सन २०२४ च्या तुलनेत ही घट लक्षणीय मानली जात आहे.

Kharif Season
Jalna News : १३०३ कोटींचे उद्दिष्ट; वाटप ४९ कोटी !

दरम्यान, सोयाबीन पिकाचे क्षेत्र २ लाख १२ हजार ४०४ हेक्टरवर पोहोचले असले तरी उत्पादकता १२७४.९९३ कि.ग्रॅ./हे. इतकी राहिली आहे. दुसरीकडे मक्याच्या पिकाने यंदा चांगली कामगिरी केली असून क्षेत्र ५७ हजार ३४५ हेक्टरपर्यंत वाढले आहे. मक्याची उत्पादकता २९९३.५७३ कि.ग्रॅ./हे. इतकी नोंदली गेली असून ती सरासरीपेक्षा अधिक आहे.

तूर पिकाचे क्षेत्र ५० हजार ८४९ हेक्टर असून उत्पादकता ११३०.६२५ कि.ग्रॅ./हे. इतकी आहे. मूग व बाजरी पिकांमध्ये मात्र क्षेत्र घटल्याचे दिसून आले. उडीद पिकाची उत्पादकता सरासरीपेक्षा वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सन २०२४ मध्ये तुरीचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ३४६.१८ हेक्टर क्षेत्र होते.

Kharif Season
Kharif Season : खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

यापैकी ४९ हजार ९९० क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातून १०२१.३३३ कि. ग्रॅ. हेक्टर इतकी उत्पादकता मिळाली. तर मागच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र वाढले. सुमारे ५० हजार ८४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. यातून सुमारे ११३०.६२५ इतकी कि. ग्रॅ. हेक्टर इतकी उत्पादकता मिळाली. मूग, उडीद, बाजरी या पिकांतही चढउतार पहायला मिळाला. बाजरीचे क्षेत्र हंमागनिहाय घटत आल्याचे दिसून येत आहे.

सन २०२४ च्या खरीप हंगामात ६७४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. ती मागच्या हंमागामात पन्नास टक्के घटून ३२६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. मागच्या तुलनेत उत्पादकता ही घटल्याचे दिसून येत आहे. उडदाचे क्षेत्र देखील हंगामनिहाय घटत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. घटत्या क्षेत्रात सोयाबीन आणि मकाचा पेरा वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, अनियमित पाऊस, बदलते हवामान आणि उत्पादन खर्चातील वाढ याचा खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदा राज्यावर एलनिनोचा प्रभाव सांगितला आहे. शिवाय, सध्या मान्सून श्रीलंकेत अडकला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news