Jalna News : ड्रायपोर्टला महसूल थकबाकीचा फटका; ४९५ एकर प्रकल्पाला सील

५२ लाखांचा जमीन महसूल थकवला; तहसीलदारांच्या कारवाईने प्राधिकरणाची नामुष्की
jalna news
ड्रायपोर्टला महसूल थकबाकीचा फटका; ४९५ एकर प्रकल्पाला सीलfile photo
Published on
Updated on

Dryport hit by revenue arrears; 495 acre project sealed

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालन्यातील दरेगाव शिवारात उभारण्यात आलेल्या बहुचर्चित ड्रायपोर्ट प्रकल्पाला महसूल थकबाकीचा मोठा फटका बसला असून, तब्बल ५२ लाख रुपयांचा जमीन महसूल थकविल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने थेट कारवाई करत ४९५ एकर क्षेत्रावरील प्रकल्पाला सील ठोकले आहे.

jalna news
India clean energy | सुधारणा आवश्यक; पण...

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ड्रायपोर्ट प्राधिकरणाकडून जमीन महसूलाची रक्कम वारंवार मागणी करूनही भरणा करण्यात आला नव्हता. महसूल विभागाने अनेकदा नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने तहसीलदार छाया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रत्यक्ष स्थळी जाऊन सील लावण्याची कठोर कारवाई केली. या कारवाईमुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच प्राधिकरणावर नामुष्की ओढवली आहे.

दरम्यान, थकबाकीची रक्कम

पूर्णतः वसूल झाल्यानंतरच संबंधित ड्रायपोर्टवरील सील काढण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाचा कठोर पवित्रा समोर आला असून, थकबाकीदारांविरोधात कारवाईचा इशारा दिला गेला आहे.

jalna news
Konkan coast danger | किनार्‍यांची धूप चिंताजनक

उल्लेखनीय म्हणजे, हा ड्रायपोर्ट प्रकल्प जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एसपीव्ही नागपूर एमएएलपी लिमिटेडमार्फत विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ४९५ एकर जागेवर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात आले आहे.

मात्र, प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच महसूल थकबाकीमुळे सील लावण्याची वेळ आली आहे. दरम्यान, ड्रायपोर्ट एका महिन्यात सुरू केले जाईल, असा विश्वास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला होता. महसुल भरल्याशिवाय, ड्रायपोर्ट मोकळे होणार नसल्याचे दिसून येत आहे.

प्रकल्पाचे संचालन विकास कोल कंपनीकडे

नुकतेच या प्रकल्पाचे संचालन चंद्रपूर येथील विकास कोल अँड मिनरल्स प्रा. लि. या कंपनीकडे पुढील १५ वर्षांसाठी सोपविण्यात आले आहे. या माध्यमातून परिसरात कंटेनर यार्ड, वेअरहाऊस, कंटेनर लिफ्टिंग सुविधा, ट्रक टर्मिनस यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news