Jalna Drought : जिल्ह्यातील फळबागांना दुष्काळाची झळ

३८ हजार हेक्टरवरील फळबागा पाण्याविना आल्या अडचणीत; शेतकरी हवालदिल !
Jalna Drought
Jalna Drought : जिल्ह्यातील फळबागांना दुष्काळाची झळfile photo
Published on: 
Updated on: 

Drought hits orchards in the jalna districtc

जालना, पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे ऐन नोव्हेंबरमध्येच विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठला. यामुळे जिल्हाभरातील ३८ हजार हेक्टरवरील फळबागा जमविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. पाण्याअभावी या फळबागा अडचणीत आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

Jalna Drought
Sambhajinagar News : जबरी चोरी करणारे दोघे गुन्हे शाखेकडून अटक

दरम्यान, जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. माणसांच्या पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असताना, तिथे फळबागांना पाणी कुठून आणायचे? असा मोठा आणि अनुत्तरित सवाल शेतकरी करत आहेत. फळबागांचे आगर असणाऱ्या जालन्यात पाण्याची टंचाई भीषण रूप धारण करत असून, यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३८,५४२ हेक्टरवरील फळबागा धोक्यात आल्या आहेत.

अनेक महिने कष्टाने जपलेल्या आणि आपल्या अपत्यासारख्या वाढवलेल्या फळबागा डोळ्यांसमोर जळत असल्याचे पाहून शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. हताश झालेला शेतकरी या भीषण पेरू परिस्थितीला कंटाळून अनेक ठिकाणी आपल्याच हाताने उभ्या बागांवर कुन्हाड चालवताना दिसत आहे.

Jalna Drought
संभाजीनगरात अडीचशे वर्षे जुनी 'सगर' उत्साहात !

केळी वर्षानुवर्षे जीवापाड जपलेल्या बागा स्वतःच्या डोळ्यांनी नष्ट करण्याची चिकू दुर्दैवी वेळ बळीराजावर ओढवली असून, हे हृदयद्रावक चित्र मनाला हेलावून टाकणारे आहे. पाऊस नाही, विहिरींना पाणी नाही, शेततळे कोरडे बोर आणि पिकांना पाणी देण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा इतर विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.