Sambhajinagar News : जबरी चोरी करणारे दोघे गुन्हे शाखेकडून अटक

२० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
sambhajinagar news
Sambhajinagar News : जबरी चोरी करणारे दोघे गुन्हे शाखेकडून अटकfile photo
Published on: 
Updated on: 

Two individuals involved in a robbery arrested by the Crime Branch

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहानुरर्मिया दर्गा परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणांना दोघांनी तू गांजाचा व्यवसाय करतो का म्हणत त्याला बेदम मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईलसह रोख रक्कम पळवली. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली. होती या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल रोहिदास जाधव (२२, रा. रमानगर, गल्ली क्रमांक ४) आणि हितेश बालन्ना यादव (२१, रा. चौसरनगर, प्रतापनगर, उस्मानपुरा) या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून दोन सुमारे २० हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले.

sambhajinagar news
Ajanta Caves : अजिंठा लेणीवर पर्यटकांचा महापूर; एसटीच्या अपुऱ्या नियोजनाचा फटका !

नरेंद्र अशोक बनसोडे यांनी ५ नोव्हेंबर रोजी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीने जात असताना जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. इथे काय करतोस, गांजा विकतो काय असे म्हणत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.

त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड मागितला. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी पुन्हा मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला. व पैसेही काढून घेतले. गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेचे सपोनि प्रशांत गंभीरराव व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी विशाल जाधव आणि हितेश यादव या दोघांना ताब्यात घेतले.

sambhajinagar news
Sambhajinagar News : रोहित पठारे हत्या प्रकरणावरून काँग्रेस आमदारांनी ओढले ग्रामीण पोलिसांवर ताशेरे

या दोघांनी लुटमारीची कबुली दिली. त्यांनी लुटलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विरेंद्र मिश्रा, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, सपोनि प्रशांत गंभीरराव तसेच संतोष पारधे, दीपक शिंदे, मनोज विश्वकर्मा आणि विजय निकम यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.