संभाजीनगरात अडीचशे वर्षे जुनी 'सगर' उत्साहात !

मोरपंख, पैंजण अन् 'बलदंड रेड्यां'ची रुबाबदार सलामी, दूधउत्पादकांचा जल्लोष
sambhajinagar news
संभाजीनगरात अडीचशे वर्षे जुनी 'सगर' उत्साहात !file photo
Published on: 
Updated on: 

250-year-old 'Sagar' tradition celebrated with enthusiasm in Sambhajinagar!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नक्षीदार झूल, रंगवलेली शिंगे, मानेभोवती मोरपंखांचे पिसारे आणि पायात पैंजण बांधून सजवलेले बलदंड रेडे... अशा रुबाबदार थाटात आणि बँडबाजा व हलगीच्या तालावर दीपावली पाडव्यानिमित्त बुधवारी (दि. ११) शहरात पारंपरिक 'रेड्यांची सगर' मोठ्या जल्लोषात पार पडली. राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती व फकीरवाडीतील श्रीकृष्ण मंदिरात या सजवलेल्या रेड्यांनी अनोखी सलामी दिली.

sambhajinagar news
Sambhajinagar News : जबरी चोरी करणारे दोघे गुन्हे शाखेकडून अटक

श्री नंदवंशी अहिर गवळी समाजाच्या वतीने सुमारे अडीचशे वर्षांपासून दीपावली पाडव्याला 'सगर' भरवण्याची ही ऐतिहासिक परंपरा आजही मोठ्या अभिमानाने जपली जात आहे. पाडवा आणि भाऊबीजेच्या स्नेहमिलनाचे औचित्य साधत शहरातील पशुपालक, दूध व्यावसायिक आणि अहिर गवळी समाजबांधवांनी आपापल्या म्हशी व रेड्यांना आकर्षक रूपात सजवून श्री संस्थान गणपती मंदिरासमोर आणले.

यावेळी रेड्यांच्या पाठीवर रंगांनी रेखाटलेली 'राजा', 'केसरी', 'सुपर पॉवर' यांसारखी नावे आणि पशुपालकांनी त्यांच्याकडून करून घेतलेल्या कवायती उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरल्या. हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी शहरवासीय आणि पशुप्रेमींनी परिसरात मोठी गर्दी केली होती.

sambhajinagar news
Sambhajinagar Crime News : किरकोळ वादातून चाकू, कोयत्यांनी हल्ले

फकीरवाडीत स्नेहमिलन आणि पशुपालकांचा गौरव

राजाबाजार येथील मुख्य सोहळ्यानंतर फकीरवाडीतील श्रीकृष्ण मंदिरातही हेल्यांची सगर उत्साहात पार पडली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हेल्यांच्या मालकांचा समाजातील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या स्नेहमिलन सोहळ्याला किशोर जांगडे, युवराज बरेटीये, आनंद बारीवाले, पूनम गौरक्षक, सजन जांगडे यांच्यासह अहिर गवळी समाजातील पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.