Drought crisis : दुष्काळाचे मोसंबी बागांवर संकट

भाव कोसळले, मोसंबी बागायतदारांची चिंता वाढली, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भाव वाढण्याची शक्यता
Drought crisis
Drought crisis : दुष्काळाचे मोसंबी बागांवर संकटfile photo
Published on: 
Updated on: 

Drought crisis on Mosambi orchards

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्हा मोसंबी हब म्हणुन ओळखला जातो. जिल्हयात जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोसंबी लागवड करण्यात आली आहे. या वर्षी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या संकटा सोबतच बाजारात मोसंबीला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने मोसंबी बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Drought crisis
Jalna News : डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

जालना जिल्ह्यातील न्यु सेलर मोसंबीला भारतातील विविध राज्यातुन मोठी मागणी आहे. पातळ साल व गोडवा हे या मोसंबी वाणाचे वैशिष्ट आहे. जिल्हयात २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. मोसंबी पिकापासुन एकेकाळी शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता.

मात्र २०१२ पासुन मोसंबीचे पिक अडचणीत सापडले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यासह मोसंबी बागांवर पडणारे विविध रोग यामुळे मोसंबी बागा सांभाळतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जालना शहरातील मोसंबी मार्केटमधे सध्या १६ हजार ते २२ हजार रुपये प्रतिटनाने मोसंबीची विक्री होत आहे. दुष्काळी परिस्थीतीत मोसंबीचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

Drought crisis
Amrut-2 scheme : अमृत-२ योजनेतून बदनापूरला लवकरच मिळणार फिल्टर पाणी

मात्र आंध्र प्रदेशासह इतर ठिकाणाहुन मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने जालना जिल्ह्यातील मोसंबीचे कोसळल्याचे चित्र आहे. प्रतिकुल परिस्थीती शेतकरी मोसंबी बागांची जोपासणा करीत असतांनाच हातात अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसाठी मोसंबी बागा सांभाळणे जिकरीचे झाले आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम मोसंबी बागांवर होत असतांनाच दसरीकडे रोही, वानरांसारख्या वन्य जिवांच्या कळपामुळेही बागांचे नुकसान होतांना दिसत आहे. पूर्वी हमखास उत्पन्नाचे पिक म्हणुन मोसंबीकडे पाहीले जात होते. मात्र हे पिकही आता शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरु लागले आहे. तीन चार वर्षानंतर येणाऱ्या संकटामुळे मोसंबी पिक अडचणीत आले आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर मधे भाव वाढण्याची शक्यता

जालना मोंढ्यात सध्या मोसंबीची आवक दररोज ४०० टनापर्यंत आहे. जालना मोंढ्यातुन दररोज दिल्ली, कलकत्ता, जयपुर, आग्रा, कलकत्ता आदी ठिकाणी मोसंबी ट्रकव्दारे पाठविली जाते. सध्या मोसंबीचे भाव कमी असले तरी नोव्हेंबर-डिसेंबर मधे ते वाढण्याची शक्यता आहे.

मोसंबी बागांचे क्षेत्र घटणार

जालना जिल्हयात पडलेल्या भिषण दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर मोसंबी बागांवर यंदा मोठे संकट कोसळणार असल्याची भिती आहे. विहीरी, तलाव कोरडे पडल्याने आगामी दहा महिने बागा जगविण्यासाठी पाणी आणायचे कोठुन असा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबी क्षेत्र आगामी काही महीन्यात पाण्यामुळे घटण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news