'DJ' banned : जाफराबादला गणेशोत्सवात 'डीजे'ला नो एंट्री

नियम तोडल्यास कारवाई : डॉ. नितीन काटेकर, गणेश मंडळ पदाधिकारी यांची बैठक
'DJ' banned
'DJ' banned : जाफराबादला गणेशोत्सवात 'डीजे'ला नो एंट्रीfile photo
Published on
Updated on

'DJ' banned during Ganeshotsav in Jafrabad

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन काटेकर यांनी दिला आहे.

'DJ' banned
Firing Case : पूर्ववैमनस्यातून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, प्रकृती स्थिर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाफराबाद शहर व तालुक्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेश मंडळांनी उत्सव सुरू करण्यापूर्वी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक असून, त्यानंतरच उत्सवासाठी आवश्यक परवानग्या घ्याव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. मंडळांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावती पुस्तकावर मंडळाचा नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

तालुक्यातील गणेश मंडळांनी परवानगी घेण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंत संबंधित पोलीस पाटील, नियुक्त अमलदार किंवा होमगार्ड यांच्याशी संपर्क व समन्वय ठेवावा. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस नगराध्यक्ष दीपक वाकडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, मोहन मुळे, कानडजे मामा, गजानन उदावंत, प्रकाश मिरगे, फारुक कुरेशी, बाळकृष्ण हिवाळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी साबेत चाऊस, कदीर बाबा, जावेद हाजी, मुकेश भारद्वाज, नगरसेवक दामू अण्णा वैद्य, माजी नगरसेवक फारुक कुरेशी, बाळू हिवाळे, शेख अजीम, सय्यद अयुब, सलमान पठाण मंगलसिंग भारद्वाज यांच्यासह विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

'DJ' banned
Jalna News : घनसावंगी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

पळवाटही नको!

गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचा निर्णय स्पष्ट करत पोलिस प्रशासनाने मंडळांना सज्जड इशारा दिला. 'कमी आवाजात डीजे लावू', अशा प्रकारच्या पळवाटा शोधू नयेत. डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि शांततापूर्ण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news