Firing Case : पूर्ववैमनस्यातून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, प्रकृती स्थिर

जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
Firing Case
Firing Case : पूर्ववैमनस्यातून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, प्रकृती स्थिरfile photo
Published on: 
Updated on: 

Firing Case : पूर्ववैमनस्यातून गोळीबार; तरुण गंभीर जखमी, प्रकृती स्थिर

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रविवार, दि. ६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आतिष पाटोळे या तरुणावर जामवाडी शिवारात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत शिवराज भुरेवाल, मयुर मेघावले आणि सिद्धार्थ धारीवाल या तीन संशयितांची नावे समोर आली आहे.

Firing Case
Jalna News : जातीवाचक शिवीगाळ अन् प्रेत अडवल्याप्रकरणी 'तिरडी' आंदोलन

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ६ रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या अवघ्या एक ते दीड तासापूर्वी संशयित आरोपी आणि जखमी आतिष पाटोळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचे पर्यवसान नंतर गोळीबारात झाले. हल्लेखोरांनी झाडलेली एक गोळी आतिष पाटोळे यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी पाटोळे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, डॉक्टरांच्या वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. किरकोळ वादाव्यतिरिक्त यामागे काही जुने वैमनस्य आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Firing Case
Jalna News : साहेब, मला न्याय द्या; मयताच्या पत्नीचा टाहो
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना काल मध्यरात्री १२:३० च्या सुमारास आतिष पाटोळे यांच्यावर फायरिंग झाल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान शिवराज भुरेवाल, मयुर मेघावले आणि सिद्धार्थ धारीवाल यांची नावे प्रथमदर्शनी समोर आली आहेत. जखमीची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
अनंत कुलकर्णी डीवायएसपी, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news