

District Collector Ashima Mittal receives 'Innovation' award in administration
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना सार्वजनिक प्रशासन क्षत्रातील नावीन्यपूर्ण कार्य, लोककल्याण व लोकसेवा सुधारणा या योगदानाबद्दल भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित "डॉ. एस. एस. गडकरी सार्वजनिक प्रशासनातील नवोपक्रम पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना अनेक सामाजिकदृष्ट्या परिणामकारक उपक्रम राबवले.
त्यांपैकी 'सुपर-५०' हा विशेष उल्लेखनीय प्रकल्प ठरला. या उपक्रमाद्वारे अनुसूचित जाती-जमातीतील होतकरू विद्यार्थ्यांना , नीट, जेईई, आयएमएम सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय, 'मिशन आत्मनिर्भर' हा उपक्रम त्यांनी दिव्यांगांसाठी राबवला.