

Devyani Kulkarni has been elected as the mayor of Ambad
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सत्ता संघर्षाचा अखेर आज रविवार दि. २१ रोजी पडदा पडला. या सत्ता संघर्षात आमदार नारायण कुचे यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. तर माजी मंत्री राजेश टोपेंना सपाटून मार खावा लागला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या देवयानी केदार कुलकर्णी यांना १३ हजार ४२३ इतकी मतं मिळाली. त्या विजयी झाल्या. तर राष्ट्रवदी शरद पवार गटाच्या श्रध्दा शिवप्रसाद चांगले यांना ७५१६ इतकी मते पडली. या पराभूत झाल्या. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाच्या सना मुस्तकीम पटेल यांना ९८८, अपक्ष वंदना सुखदेव कांबळे यांना ३१२ तर अपक्ष उमेदवार दर्शना राहूल खरात यांना २०५ इतकी मतं पडली आहे.
दरम्यान, २२ जागा असलेल्या अंबड नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. सुमारे १४ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर राकाँ शरद पवार गटाने ४, रासपाने २ आणि राकाँ. अजित पवार गटाने २ अशा जागा जिंकल्या आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून देवयानी कुलकर्णी, भाजपचा मित्र पक्ष असलेले शिवसेना (शिंदे) गटाकडून सना अमन पटेल तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या श्रद्धा शिवप्रसाद चांगले या मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र पहावयास मिळाले. भाजपाच्या "एकला चलो रे" या नाऱ्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे यांची शिवसेनाही निवडणूक रिंगणात उतरली.
माजी मंत्री राजेश टोपे यांनीही आपले उमेदवार निवडणूक रिंगणाच्या आखाड्यात उतरवले होते. अंबड नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपआपल्या परिने प्रयत्न केले होते. मात्र, भाजप वगळता इतर पक्षांना फारसे यश मिळाले नाही. भाजपाने सर्वाधिक एकू १४ जागेवर आपले उमेदवार निवडणूक आणले आहेत. ओ निकालावरुन दिसून येत आहे.
पक्षीय बलाबल
भाजपा १४, राकाँ श. प. ०४
रासपा ०२, राकाँ अ.प. ०१
काँग्रेस ०१, एकूण २२