Jalna News : जिल्ह्यात भाजपाचाच डंका, दोन नगराध्यक्षदावर निर्विवाद वर्चस्व

अंबडमध्ये आ. नारायण कुचे, तर परतुरात आ. लोणीकरांनी रोवला झेंडा
Jalna News
Jalna News : जिल्ह्यात भाजपाचाच डंका, दोन नगराध्यक्षदावर निर्विवाद वर्चस्वFile Photo
Published on
Updated on

BJP wins in Jalna district, undisputed dominance in two mayoral posts

जालना, पुढारी वृत्तसेवा :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदावर निर्विवाद आपले वर्चस्व सिध्द केले. आमदार नारायण कुचेंनी प्रतिष्ठा पणाला लावून अंबड नगर पालिकेचा गड राखला.

Jalna News
Jalna News | परतूर पालिकेवर 'कमळ' फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी

परतुरात माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकरांनी प्रतिष्ठा पणाला लावून नगर पालिकेवर भाजपाचाच झेंडा रोवला. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात लढण्यात आलेल्या निवडणुकीत भोकरदन नगर पालिकेर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

एकंदरीत या सत्तेच्या सारिपाटावर सर्वच पक्षांनी आपआपल्या पध्दतीने दावे प्रतिदावे केले होते. या दाव्या प्रतिदाव्यांना रविवार दि. २१ रोजी विराम मिळाला. सकाळी १० वाजल्या पासून मतमोजणीस सुरूवात झाली.

Jalna News
Jalna Crime News : कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात व्यावसायिकाचा मृतदेह

तीन्ही नगरपालिकेचे निकाल १२.३० वाजेपर्यंत हाती आले होते. या तीन्ही निवडणुकीत ६५ जागांपैकी २८ जागांवर भाजप, राष्ट्रवादी श.प. गटाने १९, राष्ट्रवादी अ. प. गटाने ७ जागेवर विजय मिळवला तर रासपा दोन, शिवसेना उबठा ३, काँग्रेस ५, शिवसेना शिंदे गट १ आदींना या जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप पक्ष सरस ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news