परतूर नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी

परतुरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची तुल्यबळ लढत; काँग्रेस आणि उबाठा गटानेही मारली मुसंडी
jalna news
परतूर नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयीFile Photo
Published on
Updated on

Priyanka Rakashe of the BJP has won the post of mayor of Partur.

परतूर, पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या परतूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका शहाजी राक्षे यांनी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार शांताबाई बाबू हिवाळे यांचा १७१९ मतांच्या फरकाने पराभव केला.

jalna news
Jalna Crime News : कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात व्यावसायिकाचा मृतदेह

नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली असून मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. या निवडणुकीत मतदारांचा कल अत्यंत विभागलेला राहिला. ३३,०९६ एकूण मतदारांपैकी २३, २७८ मतदान झाले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्रियंका राक्षे यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि १७१९ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

पक्षीय बलाबल : कुणाचे किती नगरसेवक ?

परतूर नगरपालिकेच्या सभागृहात यावेळेस सत्तास्थापनेसाठी मोठी

रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रत्येकी ६ जागांसह आघाडीवर आहेत.

भाजपा: ०६

राष्ट्रवादी (शरद पवार गट): ०६

राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०५

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसः ०३

शिवसेना (उबाठा): ०३

jalna news
Jalna News : जिल्ह्यात भाजपाचाच डंका, दोन नगराध्यक्षदावर निर्विवाद वर्चस्व

प्रभागनिहाय विजयी रणधुमाळी :

प्रभाग १: भाजपच्या सोनोने रत्नमाला (१३३७ मते), १ ब मधून भाजपचेच कुरेशी शेख इमरान मुन्सी (१५९६ मते).

प्रभाग २: राष्ट्रवादी (श. प.) चे ऋषिकेश कहऱ्हाळे (८०२ मते), २ व मध्ये

भाजपच्या स्नेहा अग्रवाल (८१३ मते).

प्रभाग ३ः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खतीव शाकीरोद्दीन (८४८ मते).

३ व मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काजी तय्यबा फातेमा (८७० मते) प्रभाग ४: कॉंग्रेसचे अन्सारी रुबीना मोहम्मद मुस्ताक (८४२ मते) आणि शेख कादिर अब्दुल्ला (११५६ मते).

प्रभाग ५ः राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सय्यद तहसीन बेगम (१००२ मते). ५ ब मध्ये काँग्रेसचे कुरेशी रज्जाक लतीफ (८०२ मते).

प्रभाग ६ : प्रभाग ६ अ मध्ये राष्ट्रवादी (श. प.) च्या शीला राऊत (९४५ मते), ६ ब मध्ये भाजपचे प्रकाश चव्हाण (९७७ मते).

प्रभाग ७ : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शेख तौसिफ़ सज्जाद आणि सरस्वती.

प्रभाग ८ : अ मध्ये भाजपचे डॉ. प्रदीप सातोनकर (९८० मते). ८ व मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशाखा राखे (१०३९ मते).

प्रभाग ९: मध्ये भाजपच्या पूजा काळे आणि शिवसेना (उबाठा) चे गणेश

नळगे विजयी झाले.

प्रभाग १० : मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कल्पना डहाळे (१७२६ मते - सर्वाधिक मते), शिवसेना (उबाठा) च्या मिरा कदम आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश खंडेलवाल.

प्रभाग ११ : मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबू नाथा हिवाळे आणि शिवसेना (उबाठा) च्या माधवी संतोष पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news