

Demand to invoke MCOCA against the accused in the Rajesh Korkane murder case
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील रुई येथील राजेश कोरकणे या तरुणाच्या निघृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
अंबड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. त्यात म्हटले कि, आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, पीडित कुटुंबास न्याय व सुरक्षा देण्यात यावी तसेच निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी राजेशला न्याय मिळालाच पाहिजे', 'खुन्यांना फाशीद्या" आदी घोषणा देत संताप व्यक्त केला.
महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.