Kej Crime | केज येथे गुटख्याची माहिती दिल्याच्या संशयावरून शिक्षकावर जीवघेणा हल्ला

गुटखा माफियांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी
Attack on Teacher Beed
Attack on Teacher BeedPudhari
Published on
Updated on

Attack on Teacher Beed

केज : गुटखा तस्करीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून केज येथे एका प्राथमिक शाळेतील शिक्षकावर दोन जणांनी फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करत मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

केज तालुक्यातील लाखा येथील प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले मौसीन साबेर कुरेशी हे १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११:४० वाजता आंबेडकर चौक येथे नगरपंचायत कार्यालयासमोर उभे होते. यावेळी मुजाहीद खैरूमिया खुरेशी आणि आबुजर खैरूमिया खुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Attack on Teacher Beed
Beed Crime | पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

“तू आमच्या गुटख्याची माहिती पोलिसांना का दिली? तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले,” असे म्हणत दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच हातातील फायटरने तोंड, छाती, पोट आणि नाकावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर “पुन्हा पोलिसांना माहिती दिल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली.

या प्रकरणी मौसीन कुरेशी यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात मुजाहीद खैरूमिया खुरेशी व आबुजर खैरूमिया खुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महावीर सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, मौसीन कुरेशी यांनी दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मकोका सारख्या कठोर कायद्यांखाली कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news