Jalna Crime News : दुचाकीसाठी विवाहितेचा छळ; चिमुरड्यालाही घराबाहेर काढले

माहेरून मोटारसायकल घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ.
Jalna Crime News
विवाहितेचा छळFile Photo
Published on
Updated on

Demand for money to buy a two-wheeler, harassment of a married woman; young child also thrown out of the house

जालना, पुढारी वृत्तसेवा: माहेरून मोटारसायकल घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देळेगव्हाण (ता. जाफराबाद) येथे घडली.

Jalna Crime News
Partur Theft News : खांडवी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या

फिर्यादी रमा समाधान भिसे (२३, रा. नंदापूर, ता. जि. जालना) यांचा विवाह १० मे २०२० रोजी समाधान प्रभाकर भिसे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ संसार चांगला चालला, मात्र त्यानंतर पती समाधान मिसे, सासू कमलबाई प्रभाकर भिसे, सासरे प्रभाकर आत्तम भिसे आणि दीर दीपक प्रभाकर भिसे (सर्व रा. देळेगव्हाण) यांनी विवाहितेचा छळ सुरू केला.

संशयित आरोपींनी विवाहितेकडे माहेरून मोटारसायकल घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र, विवाहितेचे आई-वडील गरीब असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतरही सासरच्या मंडळींनी छळ सुरूच ठेवला.

Jalna Crime News
Parbhani crime | पूर्णेतील दोन जबरी चो-यातील ५ गुन्हेगार चोरटे जेरबंद;८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. "जोपर्यंत १ लाख रुपये आणत नाही, तोपर्यंत घरात राहायचे नाही. जर पुन्हा आलीस तर जीवे मारून टाकू," अशी धमकी देऊन विवाहितेला तिच्या लहान मुलासह घराबाहेर काढून दिले. तेव्हापासून पीडित महिला आपल्या माहेरी राहत आहे. याप्रकरणी रमा समाधान भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलिस ठाण्यात संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार विलास आटोळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news