Jalna rain : पाझर तलाव फुटल्याने नुकसान, मंगू जळगाव येथील घटना, पुन्हा मुसळधार पाऊस

पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतात पाणी घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Jalna rain
Jalna rain : पाझर तलाव फुटल्याने नुकसान, मंगू जळगाव येथील घटना, पुन्हा मुसळधार पाऊस File Photo
Published on
Updated on

Damage due to Pazar lake bursting, incident at Mangu Jalgaon

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सोमवारी (दि.२२) रोजी पहाटेच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसात मंगू जळगाव येथील पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतात पाणी घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Jalna rain
Jalna Rain : जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, कुंडलिका, सीना नदीला महापूर

सततच्या मुसळधार पावसामुळे पुन्हा बोडखा येथील नारोळा आणि खडकी, दहीगव्हाण येथील बहिरी आणि दैठणा येथील मुसा भद्रायणी, तीर्थपुरी येथील खडकी आणि जांबसमर्थ येथील वनाची नदीला पूर आला होता. त्यामुळे परिसरातील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. तसेच अंबड ते तीर्थपुरी बससेवा तीर्थपुरी येथील खडकी नाल्याला व सुखापुरी येथील संगमेश्वर नाल्याला पाणी आल्याने बंद करण्यात आल्याने शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

तालुक्यात होणाऱ्या सततच्या अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाने नारोळा, खडकी, बहिरी, मुसा भद्रायणी, खडकी व बनाची नदीला पुन्हा पूर आल्याने अंबडहुन तीर्थपुरी, मंगरूळ, साडेगाव, मूरमा ही बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ४० गावांतील नागरिकांना १० ते १५ किमी दुरवरून तसेच जास्तीचा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे. मंगू जळगाव येथील पाझर तलाव फुटल्याने हे पाणी आजू-बाजूच्या शेतात शिरल्याने अनेकांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Jalna rain
Jalna News : चौदाशे ग्रामपंचायत कर्मचारी संपावर

विक्रमी पाऊस

राणी उचेगाव महसूल मंडळात सर्वात कमी ६२७.३ मिमी तर तीर्थपुरी महसूल मंडळात सर्वांत जास्त १०५६.९ मिमी इतका पाऊस झाला आहे. आजपर्यंतची पावसाची सरा-सरी ५९८.८ मिमी इतकी असताना तालुक्यात ८३८ मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सततच्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news