Jalna Rain : जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, कुंडलिका, सीना नदीला महापूर

विरेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविले
Jalna Rain
Jalna Rain : जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, कुंडलिका, सीना नदीला महापूर File Photo
Published on
Updated on

Return rains wreak havoc in Jalna district, Kundalika, Sina rivers flood

जालना, पुढारी वृत्तसेवा : सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झाले होते. कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तीच परिस्थिती पुन्हा दुसऱ्याच आठवड्यात सोमवार दि. २२ रोजी भल्या पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने निर्माण केली. ठिकठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे शेती पाण्याखाली गेली, व्यापारी संकुलात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शहरातील सखल भागातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली.

Jalna Rain
Jagadamba Devi : मंठ्यात जगदंबा देवी मंदिर सजले, भक्तांना पावणारी म्हणून ख्याती

जिल्हाभरात सोमवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा बसला. विरेगाव येथील पुराच्या पाण्यातून सुमारे १४ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, जालना शहरातील बसस्थानक परिसरातील सीना नदीचे पाणी पुलावरून गेल्याने काहीकाळ वाहतूक थांबली होती. शहरातील भाग्यनगर, कोठारी नगर, भोईपुरा, बसस्थानक परिसर, शंकर नगर, रमाबाई नगर आदींसह इतर ठिकाणी पावसाच्या हाहाकार पाहिला मिळाला. व्यापाप्यांच्या संकुलात पाणी शिरल्याने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांचे कोटधवधी रुपयांचे नुकसान झाले. ठिकठिकाणी नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरले. यामुळे शेतकऱ्यांची पिके आडवी झाली.

हातातोंडाशी आलेला घास निसगनि हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांतून मदतीची मागणी केली जात आहे. या भागांची पाहणी आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी करुन बाधितांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Jalna Rain
Shardiya Navratri 2025 : जालना शहरासह जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा जिल्हयात दि. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा बारा (ताशी ३०-४० कि.मी.प्र.ता. वेगाने) हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. २५ व २६ रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्तकालीन परिस्थितीत ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी केली पाहणी

जालना शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना शहरातील बसस्थानक परिसर, कोठारी नगर, भाग्यनगर, भोईपुरा यासह अन्य भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तसेच झालेल्या वित्त व जीवितहानीबद्दल तत्काळ पंचनामे करण्याचे संबंधितांना आदेश दिले. यावेळी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर आदींची उपस्थिती होती.

उखळी पाझर तलाव फुटल्याने नुकसान

जालना तालुक्यातील सेवली मंडळात काल रात्री सुमारे ६५ मि.मी. पाऊस पडला. यामुळे सेवली मंडळातील उखळी येथील पाझर तलाव अतिवृष्टीने फुटल्याने याठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी आज जालना तालुक्यातील विरेगाव, सेवली व नेर मंडळाचा दौरा करून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून, संबंधितांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

तसेच नागरिकांशी संवाद साधून शासन प्रशासन आपणांस सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार जालना श्रीमती छाया पवार आदीची उपस्थिती होती.

१४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

जालना जिल्ह्यात सर्वत्र सोमवार दि. २२ रोजी भल्या पहाटे जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील १४ नागरिक पुरात अडकले होते, जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या १४ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news