Crime News : कोर्टातील केस मागे घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला

चौघा जणांनी मिळून एका ३० वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करुन उजवा कान न ब्लेडने कापून शरीरापासून वेगळा - केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Crime News
Crime News : कोर्टातील केस मागे घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्लाfile photo
Published on: 
Updated on: 

Crime News: Youth attacked with intent to kill to force withdrawal of a court case

जालना, पुढारी वृत्तसेवाः शेतीच्या वादातून आणि न्यायालयातील खटला व मागे घेण्यासाठी दबाब टाकत, चौघा जणांनी मिळून एका ३० वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करुन उजवा कान न ब्लेडने कापून शरीरापासून वेगळा - केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Crime News
Water shortage : पाणीटंचाईचे चटके ! जिल्ह्यात ४० टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

फिर्यादी मनोज लक्ष्मण शिंदे (वय ३०, रा. शिंदे नगर, अंबड) यांचे अंबड शिवारातील शेती गट क्रमांक ३८ मधील सामायिक शेतीच्या हिश्यावरून नातेवाईक व इतर जणांसोबत न्यायालयात वाद सुरू आहे.

दि. २१ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मनोज शिंदे घरी असताना, त्यांचा चुलत भाऊ लक्ष्मण रावसाहेब पवार याने बाहेर जायचा बहाणा करून मनोज यांना दीपक ठाकूर यांच्या शेतातील एका मोकळ्या जागेत नेले. तिथे आधीच सुनील रामचंद्र शिंदे, राजेश रामचंद्र शिंदे आणि चंदर राजेश शिंदे हे उपस्थित होते. आरोपींनी तुझ्या हिस्याची शेती आम्हाला दे आणि शेतीबाबत कोर्टात टाकलेली केस मागे घे, असे म्हटले. मनोज यांनी शेती देण्यास व केस मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.

Crime News
Jalna News : बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक; मिळाला ६,९५० रुपये दर !

४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लक्ष्मण पवार आणि सुनील शिंदे यांनी मनोज यांचे दोन्ही हात व पाय पाठीमागून धरून ठेवले, तर राजेश रामचंद्र शिंदे याने त्याच्याकडील ब्लेडने मनोज यांच्या उजव्या कानावर वार करून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचा उजवा कान कापून शरीरापासून वेगळा केला. या प्रकरणी पीडित मनोज लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण रावसाहेब पवार, सुनील रामचंद्र शिंदे, राजेश रामचंद्र शिंदे आणि चंदर राजेश शिंदे (सर्व रा. शिंदे नगर, अंबड) यांच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news