Water shortage : पाणीटंचाईचे चटके ! जिल्ह्यात ४० टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

चार तालुक्यातील ८२ हजारांहून अधिक नागरिकांची तहान टँकरवर !
Water shortage
Water shortage : पाणीटंचाईचे चटके ! जिल्ह्यात ४० टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठाfile photo
Published on: 
Updated on: 

Water shortage woes! 40 tankers deployed for water supply in the district

जालना, पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे ग्रामीण भागात ऑक्टोबरच्या अखेरीस पाणी टंचाईची झळ बसत आले. सध्या जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८२ हजार ६५२ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत एकूण ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अंबड तालुक्यात सर्वाधिक १८, तर बदनापूर तालुक्यात १४ टँकर सुरू आहेत.

Water shortage
Jalna Crime : दहा तलाव परिसरात शासकीय पथकाला मारहाण

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती पाहता, जालना तालुक्यात ४, बदनापूरमध्ये १४, अंबडमध्ये १८ आणि घनसावंगी तालुक्यात ४ टँकर कार्यरत आहेत. या टँकरद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

अहवालानुसार, जिल्ह्यातील टँकरच्या एकूण ८३ खेपा मंजूर करण्यात आल्या असून, २२ ऑक्टोबर रोजी त्यापैकी ८० खेपा पूर्ण झाल्या. त्यामुळे मंजूर खेपा आणि प्रत्यक्ष झालेल्या खेपा यांमध्ये तीन खेपांची तफावत असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यात एकूण ४० टँकर कार्यरत असून, त्यामध्ये ३ शासकीय आणि ३७ खासगी टँकरचा समावेश आहे.

म्हणजेच, पाणीपुरवठ्याची बहुतांश जबाबदारी खासगी टँकरवर आहे. दरम्यान, भोकरदन, जाफराबाद, परतूर आणि मंठा या चार तालुक्यांमध्ये या अहवालाच्या संबंधित नोंदींनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा दर्शविण्यात आलेला नाही.

Water shortage
Manoj Jarange Audio clip controversy : ऑडिओ क्लिपचे सत्य समोर आणणारच : मनोज जरांगे

४४ विहीर अधिग्रहणाचाही आधार

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याबरोबरच विहीर अधिग्रहण देखील करण्यात आले आहे. जालना, बदनापूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांचा समावेश आहे. जालना मध्ये ४, बदनापूर मध्ये १६, अंबड मध्ये १८ तर घनसावंगीत ६ अशा एकूण ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरच्या मंजूर खेपा वेळेत पूर्ण करणे आणि गरजू गावांना नियमित पाणीपुरवठा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाणीपुरवठ्याशी संबंधित तपशील

लोकसंख्याः ८२,६५२

एकूण कार्यरत टँकरः ४०

शासकीय टँकरः ३

खासगी टँकरः ३७

मंजूर टँकर खेपाः ८३

प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या

खेपा : ८०

खेपांमधील तफावत : ३

सर्वाधिक टँकर असलेला

तालुकाः अंबड

अंबडमधील टँकर : १८

अंबड तालुक्यात १८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा

अंबड तालुक्यात १८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यात ३ शासकीय आणि ११ खासगी असे एकूण १४ टँकर कार्यरत आहेत. जालना आणि घनसावंगी तालुक्यांत प्रत्येकी चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news