Jalna News : लग्नसराईवर महागाईची टाच; वधूपित्यांची कसरत

दागिने, कपडे, केटरिंगपासून बॅण्डबाजापर्यंत सर्वच खर्चात वाढ
Inflation hits wedding season
लग्नसराईवर महागाईची टाच; वधूपित्यांची कसरतPudhari
Published on
Updated on

Costs have risen across the board—from jewelry, clothing, and catering to wedding bands.

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी पर्व संपताच लग्नसराईचे वेध लागतात आणि सध्या सर्वत्र विवाहसोहळ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी तुलसी विवाहाने शुभमुहूर्ताची सुरुवात झाली असून, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांत लग्नांची धामधूम शिगेला पोहोचली आहे. जुलै २०२६ पर्यंत तब्बल ५५ शुभ मुहूर्त उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागात लग्नांची अक्षरशः रेलचेल सुरू आहे.

Inflation hits wedding season
Increase grocery prices : जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ

मात्र, या आनंदोत्सवावर यंदा महागाईचे गडद सावट पडले आहे. वाढत्या दरवाढीमुळे विवाहसोहळा उरकताना वधू-वरांच्या पालकांना मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच एप्रिल महिन्यातील रखरखत्या उन्हाने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. तापमान ४० अंश सेल्ि सअसच्या पुढे गेल्याने व-हाडी मंडळी अक्षरशः घामाघूम होत आहेत.

उन्हाच्या तीव्रतेमुळे लग्नांचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा सायंकाळी ५ नंतरच विवाह सोहळे पार पाडण्याची वेळ आली आहे. दुपारी ११ ते ५ या कालावधीत रस्ते, बसस्थानके आणि बाजारपेठा ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्या पाहुण्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्याने आयोजकांना पाणी, थंड पेये, कूलर, फॅन यांची विशेष व्यवस्था करावी लागत आहे.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचा विवाह सोहळा थाटामाटात व्हावा, अशी अपेक्षा असते. यासाठी अनेकजण आयुष्यभराची साठवण खर्ची घालतात. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत आणि वाढत्या महागाईत हा खर्च परवडण्यासारखा राहिलेला नाही.

Inflation hits wedding season
वरणाला महागाईचा बसला तडका

परिणामी, वधूपित्यांची आर्थिक कसरत टोकाला पोहोचली असून अनेकांचे बजेट पूर्णपणे कोलमडत आहे. महागाईमुळे अनेक पालकांनी थाटामाटात लग्न करण्याचा विचार बदलून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यांनाही पसंती मिळत आहे. एकंदीत लग्न ही प्रतिष्ठेची बाब झाल्याने लग्नाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, वधूपित्याची दमछाक होताना दिसून येत आहे.

केटरिंग खर्च गगनाला

खाद्यपदार्थांच्या वाढत्या दरामुळे केटरिंगचा खर्च प्रचंड वाढला आहे. दूध, पनीर, साखर, तूप, मिठाई, भाज्या, फळे यांचे दर वाढल्याने जेवणावळीचे बजेट वाढले आहे. पाहुण्यांना चांगला मेन्यू देताना अनेकांना आर्थिक तडजोड करावी लागत आहे. काही कुटुंबांनी मेन्यू साधा ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news