Jalna News : घनसावंगीत औषधी विक्रेत्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी तालुक्यात औषधी विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Jalna News
Jalna News : घनसावंगीत औषधी विक्रेत्यांनी दिले तहसीलदारांना निवेदनfile photo
Published on
Updated on

Chemists in Ghansawangi Submit Memorandum to Tehsildar

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

घनसावंगी तालुक्यात औषधी विक्रेत्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टलद्वारे होणारी औषधांची विक्री तसेच संबंधित शासन निर्णयांच्या विर-ोधात हे आंदोलन करण्यात आले.

Jalna News
Jalna News ; जालना जिल्ह्यात औषधी दुकाने बंद

यावेळी औषध विक्रेत्यांच्या विविध समस्या, ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर होत असलेला परिणाम तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

औषध विक्रेत्यांनी सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक नियमांचे उल्लंघन होत असून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित बाबींमध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे उपलब्ध होणे बनावट औषधांची शक्यता तसेच ग्रामीण भागातील लहान औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती यामुळे संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Jalna News
Jalna News : ऑनलाईन औषध विक्रीवर कारवाई करा; ३०० औषध विक्रेते संपात सहभागी

तहसीलदार रमेश पागोटे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शासन स्तरावर योग्य तो निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news