

Case registered against 10 people in soybean scam case
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या संचालकांसह १० जणांवर पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या नाफेडचे केंद्राला हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे, खोटा पिकपेरा जोडून शासनाची सुमारे १ कोटी २ लाख ३८ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि संचालक अशा १० जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासंस्थेने २०२४-२५ मध्ये ३९,३७९ क्विंटल सोयाबीन खरेदी केल्याचे दाखवण्यात आले, त्यापैकी २०९३ क्विंटल जास्तीच्या सोयाबीन पीक पेऱ्याची नोंद करुन हा अपहार करण्यात आला.
संबंधितांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात भोकरदन तालुक्यातील लिहा येथील तक्रारदार संग्रामसिंह राजपूत यांनी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या मुंबई येथील मुख्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत घोटाळा उघडकीस आला, संस्थेने सोयाबीन खरेदी करताना शासनाची दिशाभूल केली. संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालकांवर खोटे दस्तऐवज सादर करणे, क्षमतेपेक्षा जास्त सोयाबीन खरेदी, या आरोपांखाली गुन्हा दाखल झाला.
या तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत खरेदी केंद्रावर सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, पासबूक, खाते उतारा, पीकपेऱ्याची पडताळणी करण्यात आली. त्यात सोयाबीनचा पेरानसलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करुन जास्तीची सोयाबीन खरेदी केल्याचे दिसून आले. प्रशासनाकडे तक्रार येताच २२ जानेवारी २०२५ रोजी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी संशयित वाघ याला प्रत्यक्ष भेटून, हमी भावात सोयाबीन विक्री न करण्याची ताकीद दिली होती. त्याला न जुमानता वाघ याने इतरांसोबत अपहार 'केला.
हमीभाव ४८९२ संस्थेने २ हजार ६८० शेतकऱ्यांकडून एकूण ३९ हजार ३७९ क्विंटल सोयाबीनखरेदी 'केले. प्राथमिक तपासणीत त्यापैकी २०९३ क्विंटल जास्तीची सोयाबीन हमीभावात खरेदी केल्याचे आढळले आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला ४८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव होता, तर बाजारात ४१०० रुपयांपर्यंत दर मिळत होता.